मुंबई National Sports Day 2024 : राष्ट्रीय क्रीडा दिन हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना समर्पित असून त्याच्या जन्मदिनी लहान मुलांपासून तरुणांपर्यंत सर्वजण बाहेर पडून मैदानी खेळांचा आनंद लुटतात. हा दिवशी बॉलिवूड सेलिब्रिटी देखील खूप मोठ्या थाटात साजरा करतात. आज, 29 ऑगस्ट रोजी संपूर्ण देश राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करत आहे. त्यानिमित्तानं बी टाऊनच्या सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून यादिवसाबद्दल आपला आनंद व्यक्त केला आहे. दरम्यान राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त रकुल प्रीत सिंगनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये ती गोल्फ खेळताना दिसत आहे.
रकुल प्रीत सिंग ते जॅकी श्रॉफ 'या' सेलिब्रिटींनी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा, सोशल मीडियावर केल्या पोस्ट - celebs shares special post - CELEBS SHARES SPECIAL POST
National Sports Day2024: राष्ट्रीय क्रीडा दिन हा आज 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या विशेष प्रसंगी बॉलिवूड सेलिब्रिटींनीही खास पोस्ट शेअर करून क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Published : Aug 29, 2024, 4:25 PM IST
बॉलिवूड स्टार्सनी केल्या पोस्ट शेअर :व्हिडिओ शेअर करताना तिनं कॅप्शन लिहिलं, "बाहेर जा खेळा, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा." तिच्या पोस्टवर अनेक चाहते आता कमेंट्स करत आहेत. एका चाहत्यानं यावर लिहिलं, "व्वा, काय शॉट आहे." दुसऱ्या चाहत्यानं लिहिलं, "जर संधी असेल तर तुम्ही ऑलिम्पिकमध्ये जाऊ शकता." आणखी एकानं लिहिलं "खूप अप्रतिम, तुम्ही कोणते शॉट खेळता?" याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करत आहेत. तसंच शिल्पा शेट्टीनं इंस्टाग्राम स्टोरीवर स्पोर्ट्स डेनिमित एक पोस्ट शेअर केली आहे. या तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं, "राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा."
खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित चित्रपट :याशिवाय जॅकी श्रॉफ आणि इतर सेलिब्रिटींनी खेळाडूंचं कौतुक केलं आणि त्यांना सोशल मीडियावर क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात योगदान दिलेल्या खेळाडूंसाठी हा दिवस विशेष महत्वाचा आहे. खेळाडूंचे योगदान लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहण्यासाठी राष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी साजरा केला जातो. चित्रपटसृष्टीत अनेक खेळाडूंच्या आयुष्यावर आधारित अनेक चित्रपट निर्मित केले गेले आहेत. यामध्ये 'भाग मिल्खा भाग ', 'पान सिंग तोमर', 'मेरी कोम', 'दंगल', 'सायना', 'अझहर', 'एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी', 'सूरमा', अलिकडेच 'चंदू चॅम्पियन' आणि अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे.