मुंबई - Coldplay Mumbai Concert 2025: आपल्या गाण्यांनी आणि संगीतानं लोकांना वेड लावणारा ब्रिटीश बॅन्ड कोल्डप्ले (Coldplay) तब्बल 8 वर्षांनंतर भारतात परफॉर्म करणार असल्याची बातमी आता समोर आली आहे. हा बॅन्ड 18, आणि 19 जानेवारी 2025 रोजी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर पुन्हा एकदा लोकांवर जादू करण्यासाठी येत आहे. ब्रिटीश बॅन्ड कोल्डप्लेच्या गाण्यांवर थिरकण्यासाठी अनेक चाहते उत्सुक आहेत. या शोची घोषणा झाल्यापासून चाहते खूप खुश असल्याचे दिसत आहेत. अनेकजण आपल्या सोशल मीडिया अकाउंट रिल शेअर करून याबद्दलची उत्सुकता व्यक्त करताना दिसत आहेत.
ब्रिटीश बॅन्ड कोल्डप्ले करणार भारतात परफॉर्म, फेक तिकिटांची झाली विक्री - Coldplay event - COLDPLAY EVENT
Coldplay Mumbai Concert 2025: ब्रिटीश बॅन्ड कोल्डप्ले (Coldplay) हा भारतात परफॉर्म करण्यासाठी येत आहे. आता या शोला पाहण्यासाठी अनेकजण तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत.
Published : Sep 26, 2024, 12:44 PM IST
तिकिटांची किंमत :शोची तिकिटे 22 सप्टेंबरपासून उपलब्ध होऊ लागली आहेत. या शोसाठी चाहते इतके उत्सुक की, कुठलाही विलंब न करता अनेकजण तिकिट बुक करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र आता तिकिटांच्या विक्रीपूर्वीच बुक माय शोची वेबसाइट क्रॅश झाली आहे. या तिकिटांची किंमत 12,500 रुपये तर 7.7 लाखांपर्यंत आहे. हा शो होत असल्यानं या तारखांच्या आसपास मुंबईमधील हॉटेल्सचे दर गगनाला भिडले आहेत. शोच्या तारखांच्या आसपास मुंबईतील काही प्रीमियम हॉटेल्सच्या किंमतीमध्ये प्रचंड वाढ होत असल्याचं दिसत आहेत. दरम्यान कोल्डप्ले इंडिया 2025चं तिकिट बुक होत नसल्यानं फॅन्स वैतागले आहेत. अनेकजण सोशल मीडियाच्या याबद्दल सांगताना दिसत आहेत.
कोल्डप्ले बॅन्डचा टूर : याशिवाय काही चाहते स्क्रीनशॉर्ट्स शेअर करून देखील आपलं दु:ख व्यक्त करताना दिसत आहेत. दरम्यान कोल्डप्ले बॅन्ड म्युझिक ऑफ द स्फेअर्स एक जागतिक दौरा करणार आहे, यामध्ये भारताचे नाव देखील समाविष्ट आहे. यापूर्वी 2016 मध्ये मुंबईतील ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलमध्ये या बॅन्डनं परफॉर्म केला होता. आता कोल्डप्लेचं म्युझिक ऑफ द स्फेअर्स वर्ल्ड टूर आशियामध्ये 11 जानेवारीपासून अबू धाबीमध्ये सुरू होणार आहे. बॅन्डमध्ये मुख्य गायक ख्रिस मार्टिन, गिटार वादक जॉनी बकलँड, ड्रमर विल चॅम्पियन आणि बासवादक बेरीमन हे कलाकार असेल. आता अनेकजण या बॅन्डला पुन्हा एकदा स्टेजवर पाहण्यासाठी आतुर आहेत. याशिवाय काहीजण कोल्डप्लेच्या मुंबई कॉन्सर्टसाठी प्लॅटफॉर्मवर बनावट तिकिटांची कथित विक्री करत आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसांत बुक माय शोनं तक्रार दाखल केली आहे.