मुंबई Mandira Bedi New Look : अभिनेत्री मंदिरा बेदी बऱ्याच दिवसापासून पडद्यावरुन गायब आहे. मात्र ती अनेकदा आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. मंदिरा नेहमीच तिच्या चाहत्यांना तिच्या फिटनेसमुळे प्रभावित करत असते. मंदिराच्या फिटनेसबद्दल चाहतेही तिचे कौतुक करतात. आता यावेळी मंदिरानं एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिचा चेहरा थोडा बदललेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती वाढत्या वयाबद्दल बोलताना दिसत आहे. या व्हिडिओवर यूजर्स कमेंट्स करुन तिला आता ट्रोल करत आहेत.
मंदिरा बेदीच्या चेहऱ्यात बदल : तिनं चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली असल्याचा आता अनेकजण अंदाज लावत आहेत. या व्हिडिओच्या पोस्टवर एका युजरनं लिहिलं, ''तुमचा चेहरा वेगळा दिसत आहे.'' दुसऱ्या युजरनं लिहिलं, ''चेहऱ्यावर शस्त्रक्रिया केली का?'' आणखी एकानं लिहिलं, ''अरे यार, तू काय केलेस? तू खूप सुंदर होतीस.'' आता अनेकजण शस्त्रक्रिया चुकीची झाली असल्याचं तिला सांगताना दिसत आहेत. मंदिरा बेदीवर शस्त्रक्रिया झाली की नाही याबाबत अद्याप काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र तिच्या चेहऱ्यामध्ये खूप बदल झाला आहे.