ETV Bharat / state

"पक्षांचं अधिवेशन म्हणजे साईभक्तांवर..."; शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनांना संजय राऊतांचा विरोध - SANJAY RAUT IN SHIRDI

शिवसेना - उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊतांनी शिर्डीत राजकीय अधिवेशन घेणाऱ्या पक्षांवर निशाणा साधला.

Sanjay Raut in Shirdi
माध्यमांशी बोलताना संजय राऊत (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2025, 7:53 PM IST

शिर्डी : विधानसभा निवडणुकीनंतर शिर्डीत राजकीय पक्षांनी अधिवेशनाचा सपाटा लावलाय. मागील पंधरा दिवसात भाजपा आणि राष्ट्रवादीचं अधिवेशन शिर्डीत पार पडलं. हे दोन्ही अधिवेशन शनिवारी आणि रविवारी अशा सुट्ट्यांच्या दिवशी झाल्यानं संजय राऊत यांनी यावर आक्षेप घेतलाय. "शिर्डीत राजकीय पक्षांचं अधिवेशन म्हणजे साईभक्तांवर अतिक्रमण झालं," असं राऊत म्हणाले. खासदार संजय राऊत, अनिल देसाई, माजी खासदार विनायक राऊत हे रविवारी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते.

जनतेचा संयम सुटण्याची वाट पाहू नये : "शनिवारी आणि रविवारी सुट्ट्यांच्या दिवसात शिर्डीत साईबाबांच्या भक्तांची दर्शनासाठी प्रचंड गर्दी असते. अशात राजकीय पक्ष अधिवेशन इथं भरवतात. या सगळ्या गर्दीचा परिणाम साईभक्तांवर होत असल्यानं शिर्डीत राजकीय पक्षांनी अधिवेशन घेऊ नये, तसेच इथल्या जनतेचा संयम सुटण्याची वाट त्यांनी पाहू नये," असं म्हणत संजय राऊतांनी शिर्डीत होणाऱया अधिवेशनाला विरोध केलाय.

महाविकास आघाडीत श्रद्धा आणि सबुरी : 12 जानेवारीला भाजपाच 'महाविजय' अधिवेशन इथं पार पडलं, तर 18-19 जानेवारीला राष्ट्रवादीचं अधिवेशन इथं झालं. आगामी काळात शिवसेनेचं अधिवेशन देखील शिर्डीत होणार असल्याचं बोललं जातंय. त्याआधीच संजय राऊतांनी शिर्डीत होणाऱ्या अधिवेशनावर आक्षेप घेत इथे होणाऱया अधिवेशनाला विरोध केलायं. "शिर्डीत अधिवेशन घेणाऱ्या राजकीय पक्षांना असं वाटतं की, साईबाबा सर्वांना आशीर्वाद देतात. मात्र, तसं काही नाही. महाविकास आघाडीत श्रद्धा आणि सबुरी आहे आणि कायम राहील याची चिंता करू नका," असंही यावेळी संजय राऊत म्हणाले.

हेही वाचा :

  1. नाशिक : अमित शाह हेच एकनाथ शिंदे यांचं दैवत; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
  2. "कधी पेपर तरी वाचतो का हा माणूस?", संजय राऊत यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका
  3. 'दिल्लीला कोण जास्त मोठी थैली देते, त्यावरुन नेत्यांचं वजन ठरते'; संजय राऊतांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.