ETV Bharat / entertainment

चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आगामी 'द दिल्ली फाइल्स'चा टीझर केली प्रदर्शित - DELHI FILES TEASER OUT

'द दिल्ली फाइल्स'चा टीझर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी रिलीज केला आहे. या टीझरमध्ये अभिनेता मिथुन चक्रवर्ती असल्याचे दिसत आहे.

The Delhi Files  teaser out
'द दिल्ली फाइल्स'चा टीझर (The Delhi Files teaser -movie poster)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 26, 2025, 5:34 PM IST

मुंबई : प्रजासत्ताक दिनानिमित्त, निर्माता-दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी त्यांच्या आगामी 'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर' या चित्रपटाचा टीझर रिलीज केला आहे. बंगालच्या दुर्घटनेवर आधारित या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर शेअर करताना अग्निहोत्री यांनी याला 'संविधानाचा आदर' असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान विवेक अग्निहोत्री यांच्या 'द काश्मीर फाइल्स'ला खूप लोकप्रियता मिळाली होती. आता 'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर' या चित्रपटाद्वारे विवेक अग्निहोत्री पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर धमाल करण्यासाठी सज्ज आहे. 'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर' चित्रपटात मुख्य भूमिकेत मिथुन चक्रवर्ती अनुपम खेर असणार आहेत.

'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर'चा टीझर रिलीज : 26 जानेवारी या खास प्रसंगी निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर रिलीज केल्यानंतर, अनेकजण हा चित्रपट चांगला असेल असं म्हणत आहे. निर्माते अग्निहोत्री बऱ्याच काळापासून 'द दिल्ली फाइल्स - द बंगाल चॅप्टर' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटाची अधिकृत घोषणा गेल्या वर्षी करण्यात आली होती. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी चित्रपटाचा टीझर आय एम बुद्धा यूट्यूब चॅनेलवर लॉन्च केला आहे. 'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर'मधील टीझरमध्ये मिथुन चक्रवर्ती एका कॉरिडॉरमध्ये जळत्या जिभेनं भारतीय संविधानाचे पठण करताना दिसत आहेत. तसेच त्याच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर ते फाटक्या कपड्यामध्ये पांढऱ्या दाढीसह असल्याचे दिसत आहे.

'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर'ची स्टार कास्ट : विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित हा चित्रपट भारतीय इतिहास, समाज आणि राजकारण याबद्दल महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करेल. 'द दिल्ली फाइल्स: द बंगाल चॅप्टर' हा चित्रपट बंगाल दुर्घटनेवर आणि हिंदू नरसंहारावर आधारित आहे. या चित्रपटात मिथुन अनुपम खेर व्यतिरिक्त पल्लवी जोशी, गोविंद नामदेव बब्बू मान, पालोमी घोष आणि पुनीत इस्सर हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत. 'द दिल्ली फाइल्स - द बंगाल चॅप्टर' स्वातंत्र्यदिनी म्हणजेच 15 ऑगस्ट 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल. या चित्रपटाला 'द काश्मीर फाइल्स'सारखे यश मिळते की नाही हे पाहणं मनोरंजक असेल.

हेही वाचा :

  1. Vivek Agnihotri announces Parva : महाभारतावर तीन चित्रपट बनवण्याचा विवेक अग्निहोत्रींचा निर्धार, 'पर्व' फ्रँचाइजीची केली घोषणा
  2. The Vaccine War : ऑस्कर लायब्ररीनं अकादमी संग्रहासाठी 'द व्हॅक्सिन वॉर'चं स्क्रिप्ट स्वीकारल्याबद्दल विवेक अग्निहोत्रीनं केला आनंद व्यक्त...
  3. Vivik Agnihotri praised Alia Bhatt : विविक अग्निहोत्रीनं आलिया भट्टवर उधळली स्तुती सुमनं, प्रतिभेची केली प्रशंसा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.