Correct Way To Drink Water: शरीराचे आरोग्य राखण्यासाठी पाणी महत्त्वाची भूमिका बजावतो. आपल्या शरीराचा 70 टक्के भाग पाण्यानी व्यापला आहे. चयापचय, मेंदूचे कार्य, रोगप्रतिकारक आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्यामुळे वजन नियंत्रणात राहतं सोबतच त्वचेचे आरोग्यही चांगले राहते. जास्त पाणी पिणे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी फायदेशीर आहे. परंतु पाणी पिताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला तर पाहूया तज्ज्ञांच्या मते, पाणी पिताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
- थोडं कोमट पाणी प्या: थंड पाण्यापेक्षा गरम पाणी पिणं शरीरासाठी चांगलं आहे. यामुळे पचनक्रिया सुधारतं आणि रक्त प्रवाह सुरळीत होतो. आयुर्वेद सांगतो की, थंड पाणी प्यायल्यास पचनावर परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे गॅस्ट्रिकचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे कोमट पाणी पिण्यास प्राधान्य द्या.
- जेवल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये: अनेकांना जेवताना किंवा नंतर पाणी पिण्याची सवय असते. मात्र, ही सवय आरोग्यासाठी चांगली नाही. जेवताना पाणी प्यायल्यास पचनक्रियेवर परिणाम होतो. यामुळे आम्लपित्त आणि छातीत जळजळ यासह पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. जेवण्यापूर्वी अर्धा तास किंवा जेवल्यानंतर एक ते दीड तासानेच पाणी प्या.
- एकाच वेळी भरपूर पाणी पिऊ नका: आपल्यापैकी बरेच असे लोक आहेत, जे एकाच वेळी भरपूर पाणी पितात. परंतु एकाच वेळी भरपूर पाणी पिणं शरीरासाठी चांगलं नाही. हे लाळेच्या कार्यावर परिणाम करते. जे पोटातील आम्लता दूर करण्यास मदत करते. जेव्हा तुम्ही एकाच वेळी भरपूर पाणी पितात, तेव्हा लाळ त्यात मिसळू शकत नाही. यामुळे पोटात त्रास होऊ शकतो. त्यामुळे एकाच वेळी भरपूर पाणी पिण्याऐवजी हळूहळू आणि काही वेळ थांबून पाणी प्या.
- खाली बसून पाणी प्या: अनेक लोक उभ राहून किंवा चालत पाणी पितात. परंतु हा चुकीचा मार्ग आहे. अशाप्रकारे पाणी प्यायल्यावर ते पाणी थेट आतड्यांपर्यंत पोहोचते. यामुळे शरीराला आवश्यक पाणी आणि पोषक तत्वे शोषून घेता येत नाहीत. त्याचा परिणाम मूत्रपिंड आणि मूत्राशयावर होऊ शकतो, असं तज्ज्ञांच म्हणणं आहे. त्यामुळे नेहमी बसून पाणी प्या.
(अस्वीकरण: ही सामान्य माहिती फक्त वाचण्यासाठी आहे. ईटीव्ही इंडिया या माहितीच्या वैज्ञानिक वैधतेबद्दल कोणतेही समर्थन करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.)