ETV Bharat / state

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 'बंधुभाव हाच धर्म' असल्याचं सांगितलंय; सरसंघचालक मोहन भागवतांचं प्रतिपादन - RSS MOHAN BHAGWAT

आपसी मतभेद विसरून सद्भावना ठेवा, कारण जगायचं असले तर सर्वांना जगावे लागेल हा नियम आहे, असे प्रतिपादन संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीत केलंय.

RSS CHIEF MOHAN BHAGWAT
सरसंघचालक मोहन भागवतांचं प्रतिपादन (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2025, 6:52 PM IST

ठाणे- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेत देशाला संविधान देताना 'बंधुभाव हाच धर्म' असे वक्तव्य केले होते, तोच धागा पकडून सरसंघचालक मोहन भागवतांनी उपस्थितांना संबोधित केलंय. समाज आपापसातील सद्भावनेच्या आधारावर चालतो, भारताचा मूळ स्वभाव आपला देश, धर्म अन् प्राण आहे. जीवन खूप सुंदर आहे, आपापल्या पारंपरिक परंपरा घेऊ चला, त्याचबरोबरच आपसात व्यवस्थित राहा. आपसी मतभेद विसरून सद्भावना ठेवा, कारण जगायचं असले तर सर्वांना जगावे लागेल हा नियम आहे, असे प्रतिपादन संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी भिवंडीत केलंय.

सरसंघचालक मोहन भागवत पाच दिवस भिवंडी मुक्कामी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे 23 जानेवारी ते 27 जानेवारीपर्यंत तब्बल पाच दिवस भिवंडी शहरातील विविध सामाजिक संघटनांसह संघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या भेटीगाठीसह विविध कार्यक्रमात सहभाग घेत आहेत, त्यातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत पाच दिवस भिवंडी मुक्कामी असून, शहरात गुरुवारी सायंकाळी त्यांचं आगमन झालंय. या निमित्त शहरातील सर्व रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. या मुक्कामात मोहन भागवत विविध बैठका घेत आहेत. तर शहरातील दोन संघ शाखांना भेटी दिल्या असून, 26 जानेवारी रोजी शहरातील पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी त्यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलंय. या प्रसंगी उपस्थित संघ कार्यकर्ते, शहरातील विविध सामाजिक संघटनाचे पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन त्यांनी केलंय.

संघ कार्यकर्त्यांच्या घरी सदिच्छा भेट : दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय झेंडावंदन करून सुमारे 22 मिनिटे आपल्या मार्गदर्शनावेळी भारत देश आजच्या घडीला कशी प्रगती करीत आहे, याचेही दाखले दिलेत. तसेच जात अन् धर्म यावरही त्यांनी प्रखर मत मांडले. विशेष म्हणजे शुक्रवारी त्यांनी ब्राह्मण आळी येथील संघाचे भिवंडी जिल्हा प्रचार प्रमुख निनाद दीक्षित यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली होती. सरसंघचालक भागवत हे भिवंडी शहरातील ओसवाल वाडी येथे गेले पाच दिवस मुक्कामी असून, त्यांच्यासह संघाचे शहरातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. गेल्या आठवड्याभरापासून भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलाय.

हेही वाचा :

  1. शक्तिपीठ महामार्गाचा कोल्हापूर, सांगलीतून 'खडतर' प्रवास; शेतकऱ्यांचा वाढता विरोध फडणवीस सरकार थोपवणार का?
  2. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयानं कोल्हापूर आणि सांगलीकर धास्तावले, पुन्हा पडणार महापुराचा विळखा?
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.