मुंबई - Laapata Ladies :'लापता लेडीज' या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाला आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे. अभिनेता आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव ही तिच्या आगामी चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. तिनं 'लापता लेडीज' या चित्रपटाचं दिग्दर्शन केलंय. तिचा हा आगामी चित्रपट कॉमेडी असणार आहे. अलीकडेच किरणनं चित्रपटाच्या कास्टिंगबद्दल एक मनोरंजक गोष्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं सांगतलं की, या चित्रपटातील भूमिकेसाठी आमिर खाननंदेखील ऑडिशन दिलं होतं. मात्र, रवी किशनच्या ऑडिशननंतर किरणनं आमिरला या भूमिकेसाठी नाकारले. या चित्रपटामध्ये रवी किशन हा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे.
'लापता लेडीज'साठी आमिर खानचं झालं रिजेक्शन :अलीकडेच एका मुलाखतीत किरण रावनं याबद्दल खुलासा केला होता. किरणच्या म्हणण्यानुसार, आमिर या पात्रामुळे खूप प्रभावित झाला होता. त्यानं या भूमिकेसाठी लुक टेस्ट देखील दिला होता. आमिर लूक टेस्ट चांगलं असल्याचं किरण रावनं सांगितलं. यानंतर रवी किशनचं ऑडिशन झाल. यानंतर तिला अधिक योग्य या भूमिकेसाठी तो वाटला. तिनं या भूमिकेसाठी रवी किशनला साईन केलं. किरणनं 'लापता लेडीज' चित्रपटात प्रसिद्ध कलाकारांना कास्ट न करण्याबाबतही चर्चा केली. यावेळी तिनं सांगितलं की आमिरकडूनही तिला या चित्रपटासाठी पूर्णपणे पाठिंबा मिळाला आहे.