महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

केजीएफ स्टार यशनं 'टॉक्सिक'च्या शूटिंगला केली सुरुवात, फोटो व्हायरल - yash and toxic movie - YASH AND TOXIC MOVIE

Yash Toxic Shooting : केजीएफ फेम अभिनेता यशनं 'टॉक्सिक' चित्रपटाच्या सेटवरून काही फोटो शेअर केले आहेत. आजपासून 'टॉक्सिक'चं शूटिंग सुरू करण्यात आलं आहे.

Yash Toxic Shooting
यशच्या टॉक्सिक चित्रपटाची शूटिंग (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 2:31 PM IST

मुंबई - Yash Toxic Movie Shooting : केजीएफ स्टार यशच्या चाहत्यांसाठी 8 ऑगस्टच्या दिवशी चांगली बातमी आली आहे. 'टॉक्सिक' या चित्रपटाचे शूटिंग सुरू झालंय. आज सकाळी यशनं सेटवरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात यश स्पोर्टिंग लूकमध्ये दिसत आहे. 'टॉक्सिक' चित्रपटासाठी यशनं आपले केस लहान केले आहेत. फोटोमध्ये यश जीन्स आणि पांढऱ्या शर्टमध्ये दिसत आहे. एक्स हँडल आणि इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना त्यानं लिहिलं, "टॉक्सिक'चा प्रवास सुरू झाला आहे." आता यशच्या या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

'टॉक्सिक' चित्रपटाची शूटिंग सुरू : 'टॉक्सिक'च्या सेटवरील पूजा समारंभाचे फोटोही समोर आले आहेत. यात यश 'टॉक्सिक' चित्रपटाच्या टीमबरोबर दिसत आहे. 'टॉक्सिक' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यापूर्वी यशनं कर्नाटकातील अनेक मंदिरांमध्ये दर्शन घेतलं होतं. त्याच्याबरोबर यावेळी चित्रपटाचे निर्माते व्यंकट के नारायण आणि त्यांचे कुटुंबही एकत्र दिसले होते. या आध्यात्मिक प्रवासात त्यांनी श्री सदाशिव रुद्र सूर्य मंदिर, धर्मस्थळ येथील श्री मंजुनाथेश्वर मंदिर, सुब्रमण्य येथील कुकू सुब्रमण्य मंदिरमध्ये जाऊन आशीर्वाद घेतला होता. यश आणि 'टॉक्सिक'ची संपूर्ण टीम चित्रपटाची एक शुभ सुरुवात असल्याचं मानत आहे.

चित्रपट कधी प्रदर्शित होणार? : यशनं अद्याप या चित्रपटाबद्दल काहीही सांगितलेलं नाही, मात्र मिळालेल्या माहितीनुसार, यश या चित्रपटात अंडरवर्ल्ड डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. 'टॉक्सिक'मध्ये तो दमदार अंदाजात दिसणार आहे. दरम्यान टीझरमध्ये दिसणारी यशची स्टाइल ही सीरीज पीकी ब्लाइंडर्सपासून प्रेरित आहे. चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर यशबरोबर कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच साऊथ अभिनेत्री नयनतारा या चित्रपटात यशच्या बहिणीची भूमिका साकारेल. गीतू मोंडस या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 10 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान यशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'माई नेम इज किराटका' आणि 'गुगली 2'मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. 'रामायण'मधील रावणासाठी तयार होणार खऱ्या सोन्याचा पोशाख - nitesh tiwari upcoming film
  2. करीना कपूर खान पडली 'टॉक्सिक' चित्रपटामधून बाहेर, जाणून घ्या कारण - kareena kapoor
  3. 'इंडियन आयडॉल'च्या स्टेजवर गोविंदानं मुलगा यशबरोबर केला सुंदर डान्स, व्हिडिओ व्हायरल - GOVINDA DANCE VIDEO

ABOUT THE AUTHOR

...view details