मुंबई -'द ग्रेट इंडियन कपिल शो सीझन 2'मधील एक व्हिडिओ एक्सवर होत आहे. सोशल मीडियावर एका यूजरनं कपिल शर्माच्या शोमधील एक क्लिप शेअर करत लिहिलं, 'कपिल शर्मानं अॅटलीच्या दिसण्याचा अपमान केला? मात्र ॲटलीनं बॉससारखे उत्तर दिलंय.' या क्लिपमध्ये कपिल अॅटलीला विचारतो की, "तू खूप तरुण आहेस आणि इतका मोठा निर्माता, दिग्दर्शक झाला आहेस. तुझ्याबरोबर असं कधी घडलं आहे का की, तुम्ही एखाद्याला भेटायला गेलात आणि त्यांनी विचारलं की अॅटली कुठे आहे?" यावर अॅटलीनं उत्तर दिलं, "मला तुमचा प्रश्न थोड्या प्रमाणात समजला आहे. माझ्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती मुरुगादास सरांचा केली, याबद्दल मी खूप आभारी आहे. त्यांनी माझ्या दिसण्याकडे पाहिलं नाही. फक्त माझ्या कहाणीवर लक्ष केंद्रित केलं होतं. मला असं वाटतं की एखाद्याला त्याच्या दिसण्यावरून नव्हे, तर त्याच्या मनाकडे पाहिले पाहिजे.'
निर्माता ॲटलीच्या दिसण्यावर विनोद केल्याचा कपिलवर आरोप : दरम्यान याप्रकरणी कपिलनं देखील एक पोस्ट केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिलं, 'प्रिय सर, या व्हिडिओमध्ये मी लूकबद्दल कधी आणि कुठे बोललो आहे, हे तुम्ही मला समजावून सांगू शकता का? कृपया करून सोशल मीडियावर द्वेष पसरवू नका धन्यवाद.' यानंतर त्यानं पुढं लिहिलं, 'मित्रांनो, तुम्हीच पाहा आणि ठरवा, मेंढरांप्रमाणे कोणाच्याही ट्विटला फॉलो करू नका.' कपिलच्या या पोस्टवर आता अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. काही यूजर्स याप्रकरणी कपिलचं समर्थन करताना दिसत आहेत. तर काही त्याच्यावर टीका करताना दिसत आहेत.