ETV Bharat / entertainment

परेश मोकाशी दिग्दर्शित हास्यस्फोटाचा नजराणा 'मु. पो. बोंबीलवाडी’, ट्रेलर प्रदर्शित! - MU PO BOMBILWADI TRAILER

'मु. पो. बोंबीलवाडी - १९४२ एका बॉम्बची बोंब' या विनोदी चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. १ जानेवारीपासून थिएटरमध्ये दाखल होणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहा.

Mu Po Bombilwadi trailer
मु पो बोंबीलवाडी ट्रेलर रिलीज (Mu Po Bombilwadi team)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : 6 hours ago

काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजलेल्या 'मु. पो. बोंबीलवाडी’ नावाच्या नाटकाचे 'मु. पो. बोंबीलवाडी - १९४२ एका बॉम्बची बोंब' हे चित्रपटीय स्वरूप आहे. रसिकांच्या मागणीवरून नाटकाच्या संहितेत काही बदल करून ही चित्रपटनिर्मिती केली गेली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच मुंबईतील जुहू येथील पीव्हीआर सिनेमाजमध्ये प्रदर्शित झाला. या कार्यक्रमाला संपूर्ण टीमनं हजेरी लावली होती. विनोदाची अनोखी शैली आणि तगड्या कलाकारांच्या अभिनयानं सजलेल्या या चित्रपटामुळे नवीन वर्षात प्रेक्षकांना हास्यस्फोटाचा नजराणा मिळणार आहे.

चित्रपटाचा ट्रेलर खळखळून हसवणाऱ्या संवादांनी भरलेला आहे. ट्रेलरमध्ये हिटलर मराठीत संवाद साधताना दिसतो, तर चर्चिललाही मराठी बोलण्यासाठी सूचना दिल्या जातात. हिटलरच्या तोंडी येणारे “माझ्या डिक्शनरीत प्रॉब्लेम हा शब्दच नाही” किंवा “तार पाठवून हिटलरला सांगायला हवे – सिरीयस स्टार्ट इमीडीएटली” असे संवाद प्रेक्षकांना खळखळून हसायला लावतात. त्याचबरोबर नाटकाच्या रिहर्सल दरम्यान घडणारे प्रसंग आणि तीन हिटलर समोर येऊन घेतलेली ओळख परीक्षाही पाहणाऱ्यांना खदखदून हसायला लावतं.

या चित्रपटात प्रशांत दामले हिटलरच्या भूमिकेत दिसणार आहे, तर चर्चिलची व्यक्तिरेखा आनंद इंगळे साकारत आहेत. त्यांच्यासोबत वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, रितिका श्रोत्री, गणेश मयेकर, दीप्ती लेले हे कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद परेश मोकाशी यांनी लिहिले असून, संगीतकार तन्मय भिडे यांनी संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. ‘हरीश्चंद्राची फॅक्टरी,’ ‘एलिझाबेथ एकादशी’ आणि ‘वाळवी’ यांसारख्या चित्रपटांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावलेल्या परेश मोकाशी आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी यांच्या जोडीचा हा आणखी एक वेगळा प्रकल्प आहे.

Mu Po Bombilwadi trailer
मु पो बोंबीलवाडी ट्रेलर रिलीज (Mu Po Bombilwadi team)

निर्मात्या मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा चित्रपट विनोदाच्या प्रेमात पडलेल्या प्रत्येकासाठी खास आहे. प्रशांत दामले यांचा हिटलर पाहणं हेच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे. त्यांच्या भूमिकेमुळे चित्रपट अधिक गमतीदार झाला आहे.” परेश मोकाशी म्हणाले की कलाकार आणि तंत्रज्ञांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हा चित्रपट भन्नाट तयार झाला आहे.

चित्रपटाची निर्मिती विवेक फिल्म्स आणि मयसभा करमणूक मंडळाने केली आहे. १ जानेवारी २०२५ पासून ‘मु. पो. बोंबीलवाडी’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.