मुंबई - वाढत्या थंडीसोबतच ख्रिसमसचेही आगमन होत आहे. आता अनेक सेलिब्रिटी ख्रिसमसची तयारी करत आहे. यामध्ये प्रियांका चोप्राचाही समावेश आहे. प्रियांका सध्या मुलगी मालतीसाठी ख्रिसमसची तयारी करत आहे. सोशल मीडियावर तिनं काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पहिल्या फोटोत प्रियांका पती निक जोनासबरोबर रोमँटिक होत असल्याची दिसत आहे. फोटोच्या पोस्टमध्ये प्रियांकानं कॅप्शनमध्ये 'होम' लिहिलंय. याशिवाय तिनं यात एक प्रेमाचा वर्षाव करत असलेला इमोजीही जोडला आहे. आता प्रियांकानं शेअर केलेले हे फोटो तिच्या चाहत्यांना खूप आवडले आहेत. यावर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.
प्रियांका चोप्रानं शेअर केले फोटो : प्रियांकानं शेअर दुसऱ्या एका फोटोत तिचा पाळीव श्वान दिसत आहे. तसेच आणखी एका फोटोत मालती बॅट घेऊन खेळताना दिसत आहे. याशिवाय दुसऱ्या फोटोत मालती टेबलवर बसून जेवण करताना दिसत आहे. शेवटच्या फोटोमध्ये निक हा हेडबँड घालून असल्याचा आहे. दरम्यान मालतीचे सोशल मीडियावर व्हायरल झालेले फोटो खूप खास असून अनेकजण तिचे कौतुक करत आहेत. प्रियांका आणि निक यावर्षी ख्रिसमसची सध्या खूप आतुरतेनं वाट पाहात आहेत. चाहत्यांना निक आणि प्रियांका यांची जोडी खूप जास्त आवडते. आता प्रियांकानं शेअर केलेल्या फोटोवर एका चाहत्यानं लिहिलं, 'तुमच्या कुटुंबाला ख्रिसमसच्या शुभेच्छा.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'तुमची मुलगी खूप सुंदर आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'मालतीला क्रिकेट बॅट पकडताना पाहून खूप छान वाटलं आहे.' याशिवाय काहीजणांनी या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्राचं वर्कफ्रंट : प्रियांका अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. तिचे इंस्टाग्रामवर 92.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. अनेकदा ती आपल्या कुटुंबाबरोबर भारतामध्ये येत असते. दरम्यान प्रियांकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती पुढं 'द ब्लफ' चित्रपटानमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती 'हेड्स ऑफ स्टेट'मध्ये जॉन सीना आणि इदरीस एल्बाबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. तसेच ती 'सिटाडेल सीजन 2 'मध्ये नादियाच्या भूमिकेत दिसणार आहे. तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये 'जी ले जरा ' हा चित्रपट आहे.
हेही वाचा :