ETV Bharat / entertainment

'बॉर्डर 2' मध्ये सनी देओल, वरुण धवनसह दिलजीत दोसांझ, काश्मीरमध्ये सुरू होणार शूटिंग - BORDER 2 SHOOT IN KASHMIR

1997 च्या गाजलेल्या 'बॉर्डर' चित्रपटाच्या सीक्वेलच्या शूटिंगला काश्मीरमध्ये सुरूवात होणार आहे. यामध्ये सनी देओल, वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ हे प्रमुख कलाकार असतील.

Sunny Deol, Varun Dhawan, Diljit Dosanjh
सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ ((Photo: ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Dec 17, 2024, 6:58 PM IST

श्रीनगर - सनी देओल, वरुण धवन, अहान शेट्टी आणि दिलजीत दोसांझ यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूडच्या बहुप्रतिक्षित 'बॉर्डर-2' या युद्ध चित्रपटाच्या शूटिंगला 2025 मध्ये सुरुवात होणार आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या तिमाहीत याचं शूटिंग तिमाहीत जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू होईल. केसरी फेम अनुराग सिंग याच दिग्दर्शन असलेला हा चित्रपट जेपी दत्ता यांच्या 1997 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट बॉर्डरचा सिक्वेल आहे.

१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित या चित्रपटाचं शूटिंग या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू होणार होतं परंतु, काही सर्नशील गोष्टींसाठी थांबल्यानंतर आता या चित्रपटाचं शूटिंग नवीन वर्षाच्या सुरुवातीला करण्याचा निर्णय टीमनं घेतला आहे.

"चित्रपट निर्माते जेपी दत्ता आणि त्यांची मुलगी निधी दत्ता यांनी त्यांच्या टीमनं शूटसाठी परवानग्या मिळवल्या आहेत," असं जम्मू आणि काश्मीर पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यानंसांगितलंय. "युद्धातील घटनांचे चित्रण करताना ऐतिहासिक अचूकता सुनिश्चित करण्यासाठी लष्कराच्या माजी प्रमुखाचा सल्ला घेत आहे,"असंही अधिकाऱ्यांनी उघड केलं आहे.

"त्यांनी काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) आणि उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये शेड्यूल केलेल्या खास दृश्यांसह राजौरी-पुंछ सेक्टरमध्ये शूटिंग करण्याची योजना आहे. टीमला जम्मू आणि काश्मीरमधील सर्व आवश्यक विभागांकडून मंजुरी मिळाली आहे, परंतु भारतीय लष्कराकडून अंतिम परवानगी मिळायची आहे. नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या जवानांच्या सहकार्याची आवश्यकता असलेल्या दृश्यांमुळे अजूनही प्रतीक्षा सुरू आहे,” असे अधिकारी पुढं म्हणाले.

दरम्यान, मुख्य अभिनेता दिलजीत दोसांझनं याआधीच काश्मीरमधील काही क्षणचित्रे शेअर केली आहेत आणि या प्रदेशाला 'पृथ्वीवरील स्वर्ग' असं म्हटलंय. गायक दिलजीतनं श्रीनगरच्या ऐतिहासिक खानकाह-ए-मौला मंदिराला भेट दिली आणि मंदिराच्या आध्यात्मिक वातावरणाची शांत दृश्ये शेअर केली. सोशल मीडियावरील सुकून नावाच्या व्हिडिओमध्ये, दिलजीतनं मंदिराच्या लॉनवर घालवलेले काही संस्मरणीय क्षणही शेअर केले आहे आणि स्थानिक कारागिरांशी संवाद साधला. दिलजीत काश्मीरच्या वैयक्तिक दौऱ्यावर असल्याचा त्याच्या टीमचा दावा आहे.

1997 मध्ये प्रदर्शित झालेला 'बॉर्डर' हा मूळ चित्रपट बॉलीवूडमधील एक प्रतिष्ठित युद्ध चित्रपट आहे. जेपी दत्ता दिग्दर्शित आणि निर्मीत, याचित्रपटात सनी देओल मेजर कुलदीप सिंग चांदपुरी, बीएसएफ भैरोसिंग असिस्टंट कमांडंट म्हणून सुनील शेट्टी, विंग कमांडर अँडी बाजवाच्या भूमिकेत जॅकी श्रॉफ, अक्षय खन्ना द्वितीय लेफ्टनंट धरमवीर सिंग भान, पुनीत इस्सार सुभेदार रतन सिंग आणि नायब सुभेदार मथुरा दासच्या भूमिकेत सुदेश बेरी होते. राखी गुलजार, पूजा भट्ट, तब्बू, शरबानी मुखर्जी आणि सपना बेदी यांनी सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. 10 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये चित्रित झाला होता आणि 65.57 कोटी रुपयांची प्रभावी कमाई केली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.