मुंबई - IIFA 2024: इंटरनॅशनल इंडियन फिल्म ॲकॅडमी (IIFA)नं सोमवार, 19 ऑगस्ट रोजी सर्व श्रेणींची नामांकन जाहीर केले आहेत. रणबीर कपूरचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'ॲनिमल' हा खूप चर्चेत होता. 2023मध्ये प्रदर्शित झालेला 'ॲनिमल' या चित्रपटाला 11 नामांकन मिळाली आहेत. आता नामांकनाच्या यादीत 'ॲनिमल' अव्वल आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांच्या रोमँटिक फॅमिली ड्रामा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'ला 10 नामांकनं मिळाली आहेत. तसेच शाहरुख खानचा 2023 मधील ॲक्शन हिट चित्रपट 'जवान' आणि 'पठाण'ला प्रत्येकी 7 नामांकन मिळाले आहेत. याशिवाय विक्रांत मॅसी स्टारर 'ट्वेल्थ फेल'ला 5 नामांकन मिळाली आहेत.
आईफा (IIFA) 2024 नामांकनाची संपूर्ण यादी
सर्वोत्तम चित्रपट
- 'ट्वेल्थ फेल'
- 'ॲनिमल'
- 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'
- 'जवान'
- 'सत्यप्रेम की कथा'
- ' सॅम बहादूर'
सर्वोत्तम दिग्दर्शन
- अमित राय - 'ओएमजी 2'
- ॲटली - 'जवान'
- करण जोहर - 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'
- संदीप रेड्डी वंगा - 'ॲनिमल'
- सिद्धार्थ आनंद - 'पठाण'
- विधू विनोद चोप्रा - 'ट्वेल्थ फेल'
सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिका (महिला)
- आलिया भट्ट - 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'
- दीपिका पदुकोण - 'पठाण'
- कियारा अडवाणी -'सत्यप्रेम की कथा'
- राणी मुखर्जी - मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे
- तापसी पन्नू - डंकी
सर्वोत्कृष्ट मुख्य भूमिका (पुरुष)
- शाहरुख खान - 'जवान'
- सनी देओल - 'गदर २'
- रणवीर सिंग - 'रॉकी और रानी की प्रेम कहानी'
- रणबीर कपूर - 'ॲनिमल'
- विकी कौशल - 'सॅम बहादूर'
- विक्रांत मॅसी – 'ट्वेल्थ फेल'