मुंबई Hrithik Roshan and Saba Azad Video:बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि सबा आझाद यांच्या ब्रेकअपच्या बातम्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. या बातमीवर दोघांनी मौन बाळगलं होतं. दरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओला पाहून असं म्हणता येईल, की या जोडप्यात पूर्वीसारखेच प्रेम अजूनही आहे. व्हिडिओत हृतिक आणि सबा एकत्र गणरायाची आरती करताना दिसत आहेत. हृतिक रोशनची बहीण सुनैना रोशनकडं गणपती बसला होता. सुनैनानं इंस्टाग्रामवर बाप्पाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तिनं बाप्पाचं कशाप्रकारे स्वागत आणि कसं विसर्जित केलं हे यात दिसत आहे.
हृतिक रोशन आणि सबा आझादचा व्हिडिओ झाला व्हायरल : सुनैनानं व्हिडिओत पूजा आणि आरतीची झलकही दाखवली आहे. या व्हिडिओमध्ये सबा आणि हृतिक एकत्र बाप्पाची आरती करताना दिसत आहेत. विसर्जनाच्या वेळीही सबा हृतिकबरोबर उभी असल्याचं दिसत आहे. या दोघांना एकत्र पाहून आता चाहते देखील खुश होत आहेत. या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी हे कपल एकत्र चित्रपट पाहण्यासाठी गेलं होतं. यावेळी दोघंही थिएटरमधून बाहेर पडताना दिसले. यादरम्यान सबा हृतिकचा हात पकडून होती. यावेळी दोघंही पापाराझींशी न बोलतान तेथून निघून गेले.