मुंबई - Fateh Teaser out : हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेता सोनू सूदचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'फतेह'चा टीझर आज 16 मार्च रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सोनू सूद थरारक भूमिकेत दिसणार आहे. 'फतेह'च्या टीझरवरून दिसून येते की, या चित्रपटामध्ये प्रचंड अॅक्शन सीन्स प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटाचं दिग्दर्शन सोनू सूदनं केलंय. 15 मार्च रोजी, सोनूनं या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केलं होतं. सोनू सूद स्टारर 'फतेह'चा टीझर हा 1.40 मिनिटांचा भीतीदायक आहे. टीझरची सुरुवात एका आवाजानं होते. या टीझरमध्ये फतेहला एक व्यक्ती (सोनू सूद ) म्हणतो की, तू 19 मार्चला 40 व्यक्तींना मारले. यावर फतेह म्हणतो 40 नाही 50ला मारले. 'यानंतर सोनू सूद काही व्यक्तींना गोळ्या मारताना दिसतो.
'फतेह'चा टीझर झाला रिलीज : सोनूनं हा टीझर शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, ''सर्वात मोठ्या ॲक्शन-पॅक थ्रिलर चित्रपटासाठी स्वतःला तयार करा!'' या चित्रपटात सोनू सूदबरोबर जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सायबर क्राईमच्या खऱ्या आयुष्यातील कहाणीवर आधारित आहे. आता या चित्रपटाचं संपूर्ण शुटिंग पूर्ण झालं आहे. सोनूनं शेअर केलेला टीझर आता अनेकजण कमेंट्स करून त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. एका चाहत्यानं त्याच्या पोस्टवर लिहिलं, ''सोनू सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे. 'फतेह' हा चित्रपट मी नक्की पाहणार आहे.'' दुसऱ्या एकानं लिहिलं, ''सोनू सर तुमचा खूप दिवसानंतर चित्रपट येत आहे, मी हा चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहे.'' आणखी एकानं लिहिल, ''फतेह' हा चित्रपट हिट होणार आहे.'' अशा अनेक कमेंट्स या पोस्टवर येत आहेत. याशिवाय काहीजण या पोस्टवर फायर इमोजी पोस्ट करत आहेत.