महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

फरहान अख्तरने शेअर केली 'डॉन ३' च्या शूटिंग लोकेशनची झलक - Farhan Akhtar Don 3 - FARHAN AKHTAR DON 3

Farhan Akhtar Don 3 : फरहान अख्तरने 'डॉन ३' च्या अज्ञात ठिकाणांचे शूट लोकेशनवरील फोटो शेअर करून चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. 'डॉन ३' बद्दल उत्सुक असलेल्या चाहत्यांना यामुळे आनंद झाला आहे.

Farhan Akhtar
फरहान अख्तर (Farhan Akhtar Instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : May 8, 2024, 5:34 PM IST

मुंबई - Farhan Akhtar Don 3 : चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता फरहान अख्तर सध्या 'डॉन ३' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार फरहानला अभिनेता रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी स्टारर 'डॉन ३' हा चित्रपट लंडन आणि जर्मनीमध्ये शूट करायचा आहे. 'डॉन ३' च्या शूट लोकेशनच्या शोधात फरहान फिरत आहे. आता फरहानने आज 8 मे रोजी सोशल मीडियावर इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.

फरहानने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेला हा फोटो युरोपमधील आहे. या फोटोत हृदयाच्या आकाराचा तुटलेला बोर्ड आहे. याच्या कॅप्शनमध्ये त्यानं लिहिले आहे, 'येथे हृदय तोडण्यास मनाई आहे', याची ओळख म्हणून फऱहानने स्ट्रीटसाइन, लव्ह, फार आऊटडोअर्स आणि प्रवास असे हॅशटॅग दिले आहेत. फरहान अख्तरने 'डॉन ३' चे शूट लोकेशन शोधत असताना हा फोटो शेअर केल्याचे बोलले जात आहे.

फरहानच्या या फोटोवर अनेक युजर्स म्हणत आहेत की त्याने जिंदगी ना मिलेगी दोबारा पार्ट 2 हा चित्रपट करावा. अनेक चाहत्यांनी कमेंट बॉक्समध्ये या फोटोवर रेड हार्ट इमोजी शेअर केले आहेत. फरहान एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली 'डॉन ३' या चित्रपटाची निर्मिती करत असून रणवीर सिंग आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत.

लोकेशन शोधल्यानंतर 'डॉन ३' चे शूटिंग ऑगस्ट 2024 मध्ये सुरू होईल आणि डिसेंबर 2024 मध्ये चित्रपट पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे. रणवीर सिंग खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी तो त्याची पत्नी दीपिका पदुकोण आणि शाहिद कपूर स्टारर चित्रपट पद्मावतमध्ये अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसला होता. त्याचवेळी 'डॉन ३' या चित्रपटात कियारा अडवाणी रणवीर सिंगसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details