महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस चाहते हैं कि..', सेलिब्रिटींची धडधड वाढविणारा हा खरा बिग बॉस कोण? पहा मुलाखत - The Voice Of Bigg Boss - THE VOICE OF BIGG BOSS

Bigg Boss Voice Artist : बिग बॉस हा भारतातील एक अतिशय प्रसिद्ध रिॲलिटी शो आहे. पण 'बिग बॉस'च्या घरात दिल्या जाणाऱ्या आदेशांना कोणाचा आवाज दिला जातो? असा अनेकांना प्रश्न पडतो. चला तर मग आज जाणून घेऊ. हा खरा बिग बॉस आहे तरी कोण?

Exclusive Interview Of Vijay Vikram Singh The Voice of Bigg Boss
विजय विक्रम सिंह (ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 8:06 AM IST

Updated : Jul 21, 2024, 8:41 AM IST

मुंबई Bigg Boss Voice Artist : 'बिग बॉस' हे टीव्ही शो संपूर्ण देशात घरोघरी लोकप्रिय आहे. पण या शोमध्ये सेलिब्रिटी स्पर्धकांना नियम सांगणारा आणि आदेश देणारा खरा बिग बॉस कोण? याचं उत्तर अजूनही अनेकांना माहित नाही. मात्र, या लोकप्रिय आवाजामागचं गुपित आता उलगडलंय. चला तर मग तुम्हाला बिग बॉसची ओळख करून देऊ, त्याचं नाव आहे विजय विक्रम सिंह! विजय विक्रम सिंह अहमदाबादला आले असता ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी त्यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी विजय विक्रम सिंह यांनी आपल्या 'बिग बॉस'मधील आजपर्यंतच्या प्रवासाचा अनुभव सांगितला.

विजय विक्रम सिंह यांची मुलाखत (ETV Bharat)

कोण आहेत विजय विक्रम सिंह? :विजय विक्रम सिंह हे एक प्रसिद्ध वॉइस आर्टिस्ट, अभिनेता, संवाद प्रशिक्षक आणि प्रेरक वक्ता आहेत. या क्षेत्रात त्यांना 18 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. त्यांनी 'बिग बॉस' आणि 'कौन बनेगा करोडपती' सारख्या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये आवाज दिलाय. तसंच 'द फॅमिली मॅन' आणि 'मिर्झापूर' सारख्या वेब सीरिजमध्येही त्यांनी काम केलंय. नॅशनल जिओग्राफिक आणि इतर माध्यमांच्या माहितीपटातही त्यांनी आवाज दिलाय. मात्र, विजय यांचा चेहरा बिग बॉसमध्ये दिसत नाही. केवळ शो दरम्यान घडणाऱ्या घटनांबाबत टिप्पणी, सूचना आणि नियमांबाबत स्पर्धकांना सांगतात. पण, त्यांचा शोमध्ये आवाज ऐकताच स्पर्धकांची धडधड वाढल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल.

या चित्रपटांमध्ये केलंय काम :विजय विक्रम सिंह यांनी 'अंधी' आणि 'स्पेशल ऑप्स' सारख्या मालिकांमध्ये उत्कृष्ट काम केलंय. तसंच त्यांनी कन्नड ब्लॉकबस्टर 'चार्ली 777' मध्ये एक संस्मरणीय सहायक भूमिका साकारली आहे. एक प्रेरक वक्ता म्हणून, त्यांनी TEDx आणि पॅशन टॉक्समधून लोकांना प्रेरित केलंय. त्यांनी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये एमबीए केलं असून व्हॉईस कोचिंगमध्ये स्पेशलायझेशन मिळवलंय.

हेही वाचा -

  1. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'या' स्पर्धकांनी केली एंट्री, देवोलीना भट्टाचार्यनं 'हा' घेतला आक्षेप - bigg boss ott season 3
  2. बिग बॉसच्या घरात अनिल कपूरला पाहायचे आहेत 'हे' बॉलिवूडचे कलाकार! - Anil Kapoor host Big Boss OTT
  3. 'बिग बॉस-17'चा विजेता मुनावर फारुकीनं घेतली 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरची विकेट
Last Updated : Jul 21, 2024, 8:41 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details