नवी दिल्ली : दिल्लीत ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी (२३ फेब्रुवारी) झाला. या समारोपाच्या कार्यक्रमासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या भाषणात अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. तसंच यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या "मला हलक्यात घेऊ नका" या वक्तव्यावरही भाष्य केलं.
उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अलीकडंच एक महत्त्वाचं वक्तव्य केलं होतं. "मला हलक्यात घेऊ नका, मी काय करतो, हे २०२२ मध्ये दिसून आलंय," असं ते म्हणाले होते. शिंदे यांचं हे वक्तव्य महाविकास आघाडीवर (MVA) असल्याचं सांगितलं जात असलं तरी, हा महायुतीतील (Mahayuti) घटक पक्षांना आणि भाजपाला इशारा समजला जात आहे. यावरुन विविध तर्क-वितर्क काढले जात असतानाच आता अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्या समोरच यावरुन सवाल केलाय.
नेमकं काय म्हणाले अजित पवार? : यावेळी बोलत असताना अजित पवार म्हणाले की, "दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असा काही शब्द वापरला की 'मला हलक्यात घेऊ नका.' आता एकनाथ शिंदे नेमकं कोणाला म्हणाले तेच कळायला मार्ग नाही. मग मशालीनं (उबाठा) हलक्यात घ्यायचं नाही की अजून कोणी घ्यायचं नाही? हे अद्याप कळालेलं नाही," असं अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले एकनाथ शिंदे? : तर यावेळी शिवसेना (उबाठा) वर निशाणा साधत एकनाथ शिंदे म्हणाले की, "राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते मला महादजी शिंदे पुरस्कार मिळाल्यानं शिवसेना (उबाठा) पक्ष नाराज आहे. मात्र, निवडणुकीनंतर आपण सर्व काही विसरून जातो. राजकारणापलीकडं जाऊन संबंध जपतो. त्यामुळं विनाकारण टीका करणे योग्य नाही."
हेही वाचा -