महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

दुलकर सलमानच्या वाढदिवसानिमित्त आगामी चित्रपटाचं शीर्षक जाहीर, पहिलं पोस्टर व्हायरल - Dulquer Salman - DULQUER SALMAN

Dulquer Salman 41st Birthday: दुलकर सलमानच्या वाढदिवसानिमित्त, त्याचा आगामी तेलुगू चित्रपट 'आकाशम लो ओका तारा'च्या निर्मात्यांनी एक नवीन पोस्टर रिलीज केलं आहे. आज चित्रपटाचं शीर्षक जाहीर केल्यानंतर सलमानचे चाहते खुश झाले आहेत.

Dulquer Salman 41st Birthday
दुलकर सलमान 41वा वाढदिवस (दुलकर सलमान (Film Poster( Instagram- Lightboxoffl))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 3:14 PM IST

मुंबई - Dulquer Salman: दुलकर सलमान आज 28 जुलै रोजी 41 वर्षांचा झाला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त आगामी तेलुगू चित्रपट 'आकाशम लो ओका तारा'च्या निर्मात्यांनी नवीन पोस्टरसह चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन पवन सादिनेनीनं यांनी केलंय. दुलकर सलमान स्टारर 'आकाशम लो ओका तारा'चं शीर्षक जाहीर झाल्यानं त्याचे अनेक चाहते त्याच्या या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहे. या चित्रपटाची निर्मिती स्वप्ना सिनेमा आणि गीता आर्ट्स करत आहेत. आता व्हायरल झालेल्या पोस्टरमध्ये दुलकर सलमान आहे. याशिवाय या पोस्टरमध्ये एक छोटीशी मुलगी शाळेमधील पोशाखात दिसत आहे.

दुलकर सलमानचा वाढदिवस :चित्रपटाच्या शीर्षकाची घोषणा करताना, निर्मात्यांनी या पोस्टवर लिहिलं, "आकाश ही मर्यादा आहे, मनाला स्पर्श करणारी कहाणी घेऊन आपल्या सर्वांचे मनोरंजन करण्यासाठी येणाऱ्या आमच्या स्टारला ब्लॉकबस्टर वाढदिवसाच्या शुभेच्छा. अधिक अपडेट्स लवकरच येणार आहे." 'आकाशम लो ओका तारा' हा चित्रपट रुपेरी पडद्यावर तेलुगू, मल्याळम, तमिळ आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमानचा हा अनोखा अंदाज चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. आता या पोस्टरच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देऊन दुलकर सलमानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असून चित्रपटाबद्दल उत्सुकता व्यक्त करत आहेत.

दुलकर सलमानचा आगामी चित्रपट : सलमान सध्या वेंकी अटलुरी दिग्दर्शित तेलुगू चित्रपट 'लकी भास्कर'च्या रिलीजच्या तयारीत आहे. त्याचा हा चित्रपट 7 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी 27 सप्टेंबरला 'लकी भास्कर' रिलीज होणार होता, पण ज्युनियर एनटीआरचा 'देवरा' त्याच दिवशी रिलीज होणार आहे, त्यामुळे तारीख बदलण्यात आली. या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त अभिनेत्री मीनाक्षी चौधरी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच नाग अश्विन दिग्दर्शित प्रभास स्टारर 'कल्की 2898 एडी'मध्ये सलमान दिसला होता. या चित्रपटामधील त्याचा छोटासा कॅमिओ अनेकांना आवडला होता. आता 'कल्की 2898 एडी'च्या सीक्वेलमध्ये त्याची भूमिका वाढण्याची अपेक्षा आहे. दरम्यान या चित्रपटात अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, कमल हासन आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत होते. दुसरीकडे, मृणाल ठाकूर, विजय देवरकोंडा आणि एसएस राजामौली यांनी या चित्रपटात कॅमिओ केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details