ETV Bharat / entertainment

रणदीप हुड्डा हॉलिवूड चित्रपटासाठी बुडापेस्टला रवाना, पुन्हा ग्लोबल स्टेजवर चमकण्यासाठी सज्ज... - RANDEEP HOODA AND HOLLYWOOD MOVIE

रणदीप हुड्डा त्याच्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी बुडापेस्टला रवाना झाला आहे.

Randeep Hooda
रणदीप हुड्डा (रणदीप हुड्डा (PR))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 21, 2025, 5:37 PM IST

मुंबई: आपल्या अभिनयानं प्रत्येक पात्रात स्वतःला झळकावून प्रेक्षकांची मनं जिंकणारा बॉलिवूडचा प्रतिभावान अभिनेता रणदीप हुड्डा त्याच्या नवीन हॉलिवूड चित्रपटासाठी सज्ज आहे. रणदीप त्याच्या पुढच्या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगसाठी बुडापेस्टला रवाना झाल्याची बातमी आता समोर येत आहे. हॉलिवूडमध्ये रणदीपनं यापूर्वी देखील काम केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 2020 मध्ये नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'एक्सट्रॅक्शन'नंतर त्याचा हा दुसरा मोठा हॉलिवूड चित्रपट असणार आहे. या चित्रपटामध्ये त्यानं क्रिस हेम्सवर्थबरोबर स्क्रीन शेअर केली होती. या चित्रपटामध्ये त्यानं उत्कृष्ट अभिनय केला होता. दरम्यान त्याच्या आगामी हॉलिवूड चित्रपटाबद्दल काहीही माहिती समोर आलेली नाही. मात्र लवकरच रणदीप हुड्डाला एका नवीन पात्रामध्ये चाहत्यांना पाहायला मिळणार आहे.

रणदीप हुड्डाचा स्वातंत्र्यवीर सावरकर झाला होता फ्लॉप : रणदीप हुड्डाचा बॉलिवूड चित्रपट 'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र त्यानं या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे. याशिवाय त्यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन देखील केलं होतं. या चित्रपटामध्ये रणदीप हुड्डाबरोबर टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे दिसली होती. आता पुन्हा एकदा जागतिक स्तरावर रणदीप हा चाहत्यांचे मन जिंकण्यासाठी येत आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 'रणदीप त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल खूप उत्सुक आहे. यावेळी रणदीप हा प्रेक्षकांना काहीतरी नवीन करताना पडद्यावर दिसणार आहे. या आठवड्याच्या अखेरीस बुडापेस्टमध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार आहे.

रणदीप हुड्डाचा आगामी चित्रपट : दरम्यान रणदीप हुड्डाच्या भारतातील कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या 'जात' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्याचं सांगितलं जात होत. या चित्रपटामध्ये तो सनी देओलबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी करत आहे. बॉक्स ऑफिसवर 'जात' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. 'जात' चित्रपटाद्वारे सनी देओल साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. 'गदर 2'च्या भव्य यशानंतर, सनी देओलला साऊथ चित्रपटसृष्टीतून अनेक चित्रपटांचे ऑफर्स येत आहेत.

हेही वाचा :

  1. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाल्यानंतर रणदीप हुड्डानं केल्या भावना व्यक्त - Randeep Hooda
  2. सरबजीत सिंगच्या मारेकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर रणदीप हुड्डानं शेअर केली पोस्ट - randeep hooda
  3. रणदीप हुड्डानं अमेरिकेच्या 'ओपेनहाइमर' चित्रपटावर केली टीका - Randeep Hooda

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.