ETV Bharat / entertainment

शाहिद कपूर अभिनीत 'देवा'चे अनेक क्लायमॅक्स झाले शूट, जाणून घ्या चित्रपट कधी होईल रिलीज... - SHAHID KAPOOR AND DEVA MOVIE

अभिनेता शाहिद कपूर स्टारर 'देवा' चित्रपटासाठी अनेक क्लायमॅक्स शूट करण्यात आले आहेत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कधी प्रदर्शित होईल याबद्दल जाणून घ्या...

Deva movie
देवा चित्रपट (देवा (Movie Poster))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 21, 2025, 4:39 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि साऊथ अभिनेत्री पूजा हेगडे यांचा 'देवा' चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. या चित्रपटाची क्रेझ आता सोशल मीडियावर देखील पाहायला मिळत आहे. टीझर असो वा धमाकेदार ट्रेलर यामधील शाहिदचा अभिनय अनेकांना आवडला आहे. शाहिद आणि पूजाचे चाहते त्यांचा हा आगामी चित्रपट पाहण्यासाठी खूप आतुर आहेत. या चित्रपटाचं ट्रेलर आणि 'भसड मचा' हे गाणं चाहत्यांना खूप आवडलं आहे. आता शाहिदच्या चाहत्यांनी 'देवा' चित्रपट रिलीज होण्यापूर्वी हिट घोषित केला आहे. सध्या अनेकजण या चित्रपटाच्या रिलीजची वाट पाहात आहेत.

शाहिद कपूर स्टारर 'देवा' चित्रपटाचा क्लायमॅक्स : याशिवाय 'देवा' चित्रपटाचा क्लायमॅक्स काय असेल याबद्दल प्रत्येकजण जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान शाहिद कपूरचा हा चित्रपट रुपेरी पडद्यावर 2025मध्ये रिलीज होणार आहे. 'देवा' चित्रपटासाठी अनेक क्लायमॅक्स शूट करण्यात आले आहेत. याशिवाय कलाकार आणि क्रूलाही माहित नाही की, अंतिम टप्प्यात कोणता क्लायमॅक्स ठेवला आहे. 'देवा' चित्रपटाचा क्लायमॅक्स हा निर्मात्यांनी गुप्त ठेवला आहे. आता या चित्रपटामधील क्लायमॅक्स कुठला असेल, याबद्दल एक रहस्य आहे.

'देवा' चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये शाहिद कपूरची अ‍ॅक्शन : शाहिद कपूर स्टारर 'देवा'च्या ट्रेलरला प्रचंड पसंत केलं गेलं आहे. यामध्ये शाहिद कपूर हा जबरदस्त डान्स आणि अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसत आहे. या चित्रपटामध्ये तो एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय 'देवा'मध्ये पूजा हेगडे, पावेल गुलाटी, कुब्रा साइट, प्रवेश राणा हे कलाकार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'देवा' चित्रपटात शाहिद आणि पूजामध्ये सुंदर केमिस्ट्री दाखवण्यात आली आहे. प्रसिद्ध मल्याळम दिग्दर्शक रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित आणि झी स्टुडिओज आणि रॉय कपूर फिल्म्स निर्मित 'देवा' या चित्रपटात धमाकेदार अ‍ॅक्शन प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 31 जानेवारी 2025 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होत आहे.

हेही वाचा :

  1. शाहिद कपूर आणि पूजा हेगडे स्टारर 'देवा'चा टीझर प्रदर्शित, पाहा व्हिडिओ
  2. शाहिद कपूर आणि पूजा हेगडे स्टारर ॲक्शन थ्रिलर 'देवा'ची रिलीज डेट नवीन पोस्टरसह आली समोर
  3. शाहिद कपूर स्टारर 'देवा' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, दमदार अ‍ॅक्शन पाहून चाहते झाले थक्क...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.