महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'देवरा पार्ट 1'मध्ये बॉबी देओलची एन्ट्री, ज्युनियर एनटीआरशी देणार लढत - Bobby Deol in Devra

Bobby Deol's entry in Devra : साऊथ सुपरस्टार ज्युनियर एनटीआरचा बहुप्रतीक्षित 'देवरा पार्ट 1' चित्रपटामध्ये बॉबी देओलची खलनायक म्हणून एन्ट्री झाली आहे. याबद्दल जाणून घेण्यासाठी वाचा...

Bobby Deol's entry in Devra Part 1
'देवरा पार्ट 1'मध्ये बॉबी देओलची एन्ट्री ('देवरा पार्ट 1' (Movie POSTERS))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 25, 2024, 7:31 PM IST

मुंबई - Bobby Deol's entry in Devra : दक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एनटीआर स्टारर अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपट 'देवरा भाग 1' हा 2024 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाच्या रिलीजला आता फक्त दोन महिने उरले आहेत, पण रिलीजपूर्वीच त्याच्याशी संबंधित एक स्फोटक अपडेट समोर आली आहे. 'अ‍ॅनिमल' चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणारा बॉबी देओल 'देवरा पार्ट 1' मध्ये दाखल झाला आहे. यामध्ये बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान हे कोरटाला शिवा दिग्दर्शित 'देवरा भाग 1' या चित्रपटात आधीच निश्चित झाले आहेत. या चित्रपटात सैफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे आणि चित्रपटाच्या शेवटी बॉबी देओलची एन्ट्री होणार आहे. दरम्यान, 'देवरा पार्ट 2' मध्ये, बॉबी आणि सैफ दोघेही ज्युनियर एनटीआरबरोबर एकत्र काम करतील.

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर 'देवरा पार्ट 1' मधून टॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या चित्रपटात जान्हवीची फार मोठी भूमिका नाही. चित्रपटाच्या दुस-या भागात तिचे बहुतेक सीन्स पाहायला मिळणार आहेत.

ज्युनियर एनटीआर, जान्हवी कपूर आणि सैफ अली खान यांच्याबरोबर रम्या कृष्णन देखील 'देवरा पार्ट 1' या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट मोठ्या बजेटमध्ये बनवला गेला आहे, यासाठी निर्मात्यांनी चित्रपटाच्या VFX वर 140 कोटी रुपये खर्च केल्याचे सांगण्यात येतंय. चित्रपटाच्या स्पेशल इफेक्ट्सवर ३३ टक्के बजेट खर्च करण्यात आल्याचं बोललं जात आहे.

'देवरा पार्ट 1' हा ज्युनियर एनटीआरच्या कारकिर्दीतील 30 वा चित्रपट आहे. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर पिता-पुत्राच्या भूमिकेत दिसणार आहे. 27 सप्टेंबर रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित होणार आहे. यापूर्वी हा चित्रपट 10 ऑक्टोबर 2024 रोजी प्रदर्शित होणार होता.

ABOUT THE AUTHOR

...view details