मुंबई - Bipasha Karan wedding anniversary :अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर हे बी-टाऊनमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. अनेकदा हे जोडपे त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. दरम्यान बिपाशानं पती करण सिंग ग्रोव्हरला 8 व्या वेडिंग ॲनिव्हर्सरीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्यानं अधिकृतपणे 28 एप्रिलला लग्न केलं होत. यानंतर त्यांनी 30 एप्रिल 2016 रोजी भव्य लग्न केलं होत. बिपाशानं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर पती करणबरोबरचे काही फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, "माझे सर्वकाही, ज्या दिवसापासून आम्ही अधिकृतपणे पती-पत्नी बनलो त्या दिवसापासून 8 वर्षे, वेळ खूप वेगानं गेला आहे. दररोज माझ्यावर अधिक प्रेम केल्याबद्दल धन्यवाद."
बिपाशा आणि करणला दिल्या चाहत्यांनी शुभेच्छा :पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये बिपाशा आणि करणमधील प्रेम हे दिसून येत आहे. या फोटोत बिपाशा लाल रंगाच्या सूटमध्ये सुंदर दिसत आहे, तर करण पांढऱ्या रंगाच्या शेरवानीमध्ये खूपच देखणा दिसत आहे. पोस्ट शेअर होताच, चाहते या जोडप्याला त्याच्या लग्नाच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा देत आहेत. या पोस्टवर एका चाहत्यानं बिपाशा आणि करणला शुभेच्छा देत लिहिलं, "तुमच्या दोघांची जोडी खूप सुंदर आणि एकत्र रहा." दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, "बिपाशा आणि करण तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा." आणखी एकानं लिहिलं, "लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा एकत्र खुश रहा." याशिवाय काही सेलिब्रिटींनी त्याच्या या पोस्टवर हार्ट इमोजी जोडून या जोडप्यावर अभिनंदानाचा वर्षाव केला आहे.