महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस ओटीटी 3' मध्ये पत्नी कृतिकाला पाहून अरमान मलिक संतापला, कारण काय? - Bigg Boss Ott 3 - BIGG BOSS OTT 3

Bigg Boss Ott 3 : 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये अरमान मलिक आणि त्याची पत्नी कृतिका मलिक सध्या चर्चेत आहे. या शोच्या 13 जुलैच्या एपिसोडमध्ये कृतिकानं तंग (टाईट) कपडे घातल्यानंतर अरमान मलिक संतापला.

Bigg Boss Ott 3
बिग बॉस ओटीटी 3 (Armaan Malik - instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 14, 2024, 1:55 PM IST

मुंबई - Bigg Boss Ott 3 : 'बिग बॉस ओटीटी 3'च्या प्रत्येक नवीन एपिसोडमध्ये जबरदस्त ड्रामा पाहायला मिळत आहे. आता हा शो खूप रंजक झाला. बिग बॉस घरात कामावरून खूप भांडणे पाहायला मिळत आहे. नामांकन प्रक्रियेदरम्यान अचानक बदललेले गोष्टी हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. 'बिग बॉस ओटीटी 3'च्या रिॲलिटी शोनं प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. नवीन एपिसोडमध्ये होस्ट अनिल कपूरनं स्पर्धकांना चांगलेच धारेवर धरले होते. सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आणखी एक घटना म्हणजे, अरमान मलिकनं त्याची पत्नी कृतिकाला जिम वेअर व्यतिरिक्त लूज कपडे घालण्यास सांगितलं होतं.

कृतिकाला दिला अरमाननं सल्ला : 'बिग बॉस ओटीटी 3' च्या 13 जुलैच्या भागामध्ये, कृतिका मलिकला गुलाबी आणि काळ्या रंगाचे जिम वेअर घातलेले पाहिल्यानंतर अरमानला राग येतो. कृतिकानं परिधान केलेल्या टॉपच्या मागील बाजूस कटआउट डिझाइन्स होत्या. ट्राउझर्स फिट होता. जेव्हा ती अरमान मलिकच्या जवळून जाते, तेव्हा तो तिला कपडे बदलण्यास आणि लूज कपडे घालण्यास सांगतो. त्यानंतर ती अरमानला म्हणते "मी पायजमा घालू का?" यानंतर तो उत्तर देतो, "ठीक आहे, यात फिट दिसते." कृतिका हे ऐकून ती तिथून निघून जाते. त्यानंतर तिनं स्वयंपाक करताना काळ्या रंगाचे जाकीट घातलेले दिसते.

अरमान आणि कृतिकाचे फोटो व्हायरल :शोच्या आधीच्या एपिसोडमध्ये, कृतिका मलिक चंद्रिका दीक्षितबरोबर विशाल पांडेनं केलेल्या कमेंटबद्दल बोलताना दिसते. त्याच संभाषणादरम्यान, कृतिकानं सांगितलं की संपूर्ण घटनेबद्दल जाणून घेतल्यानंतर, ती डीप-नेक डिझाइन असलेले ट्रेंडी कपडे घालू शकत नाही. कारण तिला अस्वस्थ वाटू लागले. आता लोक अरमानला सोशल मीडियावर ट्रोल करत आहेत. अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांचे नाते 'बिग बॉस ओटीटी 3' च्या सुरुवातीपासूनच चर्चेत आहे. दरम्यान आता बिग बॉसच्या घरातील अरमान आणि कृतिकाचे काही सुंदर क्षणांचे फोटो समोर आले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

हेही वाचा :

  1. बिग बॉस ओटीटीमध्ये राडा, विशाल पांडेच्या 'त्या' शब्दामुळे अरमाननं मारली झापड - Bigg Boss ott 3
  2. कृतिका मलिकनं धक्कादायक विधान; बिग बॉसमध्ये खळबळ, पती अरमान मलिकलाही धक्का - bigg boss ott 3

ABOUT THE AUTHOR

...view details