महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये सूरज चव्हाणला सेलिब्रिटी आणि प्रेक्षकांचा पूर्ण पाठिंबा - Bigg Boss Marathi Suraj Chavan - BIGG BOSS MARATHI SURAJ CHAVAN

Bigg Boss Marathi Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5' हा शो खूप रंजक होत आहे. या शोमध्ये सूरज चव्हाण हा मराठी स्टार्स आणि प्रेक्षकांचा लाडका बनला आहे.

Bigg Boss Marathi Suraj Chavan
'बिग बॉस मराठी' सूरज चव्हाण (instagram)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 17, 2024, 2:31 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi Suraj Chavan : 'बिग बॉस मराठी 5'मध्ये स्पर्धक शो जिंकण्यासाठी आता खूप प्रयत्न करताना दिसत आहेत. 'बिग बॉस'च्या घरामध्ये अरबाज पटेल नवीन कॅप्टन झाला आहे. अरबाज शोमध्ये टास्क जिंकून कॅप्टन बनला. अरबाज कॅप्टन बनला असला, तरी या शोमध्ये सध्या चर्चा ही सूरजची होताना दिसत आहे. कॅप्टन्सी टास्कमध्ये निक्की, जान्हवी, अरबाज आणि धनःश्‍याम यांना हरवण्याचा दमदार प्रयत्न सूरजनं केला होता. आता अनेकजण सोशल मीडियावर सूरजचं कौतुक करताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये सूरजला प्रेक्षक भरभरून प्रेम देत आहेत.

सूरज चव्हाणचा दमदार प्रयत्न :कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज चव्हाण हा जान्हवी, निक्की, अरबाज आणि धनःश्याम यांच्या विरुद्ध होता. या टास्कमध्ये सूरजनं त्याच्यावर दादागिरी करणाऱ्या वैभव चव्हाणलादेखील त्यानं गप्प केलं. कॅप्टन्सी टास्कमध्ये सूरज हा एकटाच भिडला होता. आतापर्यंत सूरजला प्रेक्षकांचा पाठिंबा होता. मात्र त्याचं कौतुक सेलिब्रिटींनीही केली आहे. सूरज चव्हाणचं कौतुक करताना अभिनेता पुष्कर जोग, जय दुधाणे, निर्माते संदीप सिकंद आणि उत्कर्ष शिंदे यांनी त्याला आता सोशल मीडियाच्या माध्यामातून पाठिंबा दिला आहे. सोशल मीडियावर अनेकजण सूरज विजयी होणार असल्याचा भाकीत करताना दिसत आहेत.

मराठी स्टार्सनं दिला पाठिंबा : सूरजचं कौतुक करत जय दुधाणेनं सोशल मीडियावर इंस्टाग्रामवर स्टोरीवर लिहिलं, "लव्ह यू सूरज भावा असंच खेळत राहा, लढत राहा भावा." पुष्कर जोगनं सूरजला पाठिंबा देत लिहिलं, "चल सूरज... तू टक्कर दे मित्रा, योगिता चव्हाणबरोबर राहा आम्ही तुझ्या पाठीशी आहोत." 'बिग बॉस' मराठीचा माजी स्पर्धक गायक उत्कर्ष शिंदे यानं सूरजला पाठिंबा देत लिहिलं, "निक्की, जान्हवी, अरबाज 1, अरबाज 2 काय घाबरले राव. सूरज आज तुझ्या हिंमतीच्या समोर बाकी सर्व पानीकम चाय वाटले. शिंदेशाहीसलाम." सूरजला आता स्टार्स आणि प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'चा नवीन प्रोमो रिलीज, निक्की तांबोळी करणार कॅप्टन्सी टास्कदरम्यान राडा - bigg boss marathi 5
  2. सूरज चव्हाणनं केली इच्छा व्यक्त, 'बिग बॉस' मराठीची ट्रॉफी जिंकेल? - Bigg Boss Marathi
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये अंकिता वालावलकर आणि पंढरीनाथ कांबळेबरोबर निक्की तांबोळीनं केला वाद - Bigg Boss Marathi Season 5 Day 16

ABOUT THE AUTHOR

...view details