Bigg Boss Marathi Season 5 Day 16 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील स्पर्धक घरात कोणत्याही कारणामुळे भांडताना दिसत आहेत. 'भाऊच्या धक्क्यावर' होस्ट रितेश देशमुखनं घरातील प्रत्येक सदस्यांना आपला खेळ चांगला करण्यास सांगितलं आहे. भाऊच्या धक्क्यावर' दुसऱ्या आठवड्यात कोणताही सदस्य घरातून एलिमिनेट झालेला नाही. 'बिग बॉस मराठी'च्या घरातील तिसऱ्या आठवड्याची सुरुवात ही निक्कीच्या भांडणापासून होणार आहे. निक्कीनं बिग बॉसच्या घरात कॅप्टन अंकिता वालावलकरबरोबर धक्काबुक्की केली. याशिवाय ती पंढरीनाथ कांबळेला अर्थात पॅडीला खडेबोल सुनावताना दिसली.
निक्की तांबोळीनं केला घरात राडा : 'बिग बॉस मराठी'च्या 16व्या एपिसोडमध्ये खिलाडी अक्षय कुमार हा आपल्या 'खेल खेल में' या चित्रपटाच्या टीमसह आला होता. त्यावेळी त्यानं घरातील सदस्यांबरोबर मजेदार संवाद केला. आता नवीन आठवड्याची सुरुवात झाली आहे. पुन्हा एकदा घरात स्पर्धकांचा कल्ला ऐकायला मिळेल. 'बिग बॉस मराठी 5'मधील एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये निक्की पॅडीसह घरातील काही सदस्यांवर भडकलेली दिसून येत आहे. या प्रोमोत निक्की पॅडीला म्हणते, "माझ्या वस्तूंना हात लावला?" यानंतर तो म्हणतो "मी माझी ड्युटी करत आहे. यावर निक्की म्हणते, " कामं करायची आहेत...समजलं ना." यानंतर पॅडी म्हणतो "तू तुझं काम कर समजलं." राग अनावर झालेल्यावर निक्की ही पॅडीचे कपडे फेकते. यावर तो म्हणतो, "माझ्या कपड्यांना हात लावू नको."