मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' घरात राडा आणि कल्ला रोजच पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या नॉमिनेशन टास्कमध्ये टीम अ (A) आणि टीम ब (B)नं स्पर्धा जिंकण्यासाठी 'बिग बॉस'च्या घरात खूप कल्ला केला. नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता 'बिग बॉस'च्या घरात कॅप्टन्सी टास्क होईल. आता या टास्कमध्येदेखील कल्ला-राडा होईल. 'बिग बॉस'च्या घरात आज कॅप्टन्सी टास्कदरम्यान खूप राडा होणार आहे. 'बिग बॉस' निर्मात्यानं आजच्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. यात निक्की तांबोळी अरबाजला घरातील सदस्यांना मारण्यास सांगताना दिसते. याशिवाय या टास्कदरम्यान अभिजीत सावंत वेदनेनं कळवळताना दिसत आहे.
निक्की तांबोळी घरात करणार कल्ला :आजच्या एपिसोडमध्ये 'बिग बॉस'च्या घरात नवीन कॅप्टन होण्यासाठी नवीन टास्क देण्यात येणार आहे. 'बिग बॉस'च्या नवीन प्रोमोत दिसत आहेत की, नवीन टास्कमध्ये घरातील सदस्यांना होडीत बसून मोती शोधायचे आहेत. यानंतर कॅप्टनसी पदाच्या उमेदवारांना बाजूला काढायचं, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, प्रोमोत घरातील सदस्य निक्कीला अडवताना दिसतात. यानंतर ती म्हणते, "मला पकडायचं नाही". याशिवाय अभिजीत म्हणतो, "अरबाज, तुला आतमध्ये जाण्यास परवानगी नाही". यावर निक्की बोलते, "अरबाज घेच , मार याला.. अरबाज मार. याला मार." यानंतर अभिजीतला इजा झाल्याचं दिसतं आणि घरातील सदस्य त्याच्याकडे जाताना दिसतात.