मुंबई - Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी 5' हा शो प्रेक्षकांना खूप आवडत आहे. 'बिग बॉस'च्या घरात नेहमीच कोणत्याही कारणामुळे भांडणं होताना दिसतात. आता तीन आठवड्यांतच घरात सदस्यांमध्ये नाती निर्माण झाली आहे. घनश्याम दरोडे आणि निक्की तांबोळी यांच्या बहीण-भावाचं नातं निर्माण झालं. मात्र रक्षाबंधनाच्या दिवशीच या दोघांमध्ये वाद होताना दिसणार आहे. आजच्या एपिसोडमध्ये निक्की आणि घन:श्याममध्ये वाद होईल. 'बिग बॉस मराठी'घरात वीकेंडला झालेल्या 'भाऊच्या धक्क्या'वर घरातील सदस्यांना होस्ट रितेश देशमुखनं चांगलंच सुनावलं होतं.
घनःश्याम आणि निक्कीमध्ये वाद :आधीच 'बिग बॉस'च्या घरात दोन गट पडले आहेत. रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये निक्की तांबोळी घनःश्याम दरोडेला म्हणते, "तू फेक आहेस." यानंतर घनश्याम तिला विचारतो, "काय फेक वागलो ते सांग, तू कशी आहे, हे अख्ख्या जनतेला दिसलं आहे. मी तुला सख्ख्या बहिणीचा दर्जा दिला होता." यानंतर लगेच निक्की म्हणते,"नको देऊ दर्जा." यावर घनःश्याम म्हणतो, "निक्कू ताई बोलल्यामुळे घात झालाय ना माझा." प्रोमोमध्ये घनःश्याम हा खूप दुखावला असल्याचा दिसत आहे. निक्की आणि घनःश्याममध्ये कशामुळे वाद झाला याबद्दल आज कळणार आहे. सध्या निक्की आणि घनःश्याम यूजर्सच्या निशाण्यावर आहेत.