मुंबई - Akshay Kumar and Tiger Shroff : श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम आज 22 जानेवारी होत आहे. यानिमित्तानं बॉलिवूड आणि साऊथ स्टार्स राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येत पोहोचले आहेत. काही वेळापूर्वीच 'महानायक' अमिताभ बच्चन हे अभिषेक बच्चनसोबत अयोध्येला पोहोचले आहेत. याशिवाय अभिनेता 'सुपरस्टार' रजनीकांत आधीच अयोध्येला गेले आहेत. आज 22 जानेवारीला पहाटे 'मेगास्टार' चिरंजीवी कुटुंबासह अयोध्येला पोहोचले. राम मंदिराच्या औपचारिक उद्घाटनासाठी अनेक बॉलिवूड आणि दाक्षिणात्य स्टार्सना निमंत्रित करण्यात आलं आहे. या यादीत अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांचादेखील समावेश होता. श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यात हे दोन्ही स्टार्स उपस्थित राहू शकले नाहीत.
अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफने शेअर केला व्हिडिओ : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ त्याच्या आगामी अॅक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. आज, 22 जानेवारीच्या पहाटे, अक्षय आणि टायगर यांनी या शुभ दिवसाच्या शुभेच्छा चाहत्यांना दिल्या आहेत. हा व्हिडिओ या दोघांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये हे दोघे व्हॅनिटी व्हॅनजवळ बसले आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला अक्षय कुमार बोलताना दिसत आहे की, ''नमस्कार मित्रांनो, मी अक्षय कुमार आणि हा माझा मित्र टायगर, आमच्या दोघांकडून तुम्हा सर्वांना जय श्रीराम.''