पाटणा : ट्रक आणि ऑटो रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात तब्बल 7 मजूर ठार झाले. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. हा भीषण अपघात बिहारची राजधानी पाटणा इथं रविवारी रात्री उशीरा झाला. गंभीर जखमी झालेल्या मजुरांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ऑटो पाटण्यातील मसौरीहून नौबतपूरकडं जात असताना भरधाव ट्रकला धडकल्याचंही यावेळी सूत्रांनी सांगितलं.

"मसौरी इथल्या नुरा बाजाराजवळ ट्रक आणि ऑटो रिक्षाची टक्कर झाली. मृतांपैकी बहुतेक मजूर आहेत. घटनेची कारणं तपासली जात आहेत." - विजय यादवेंदु, एसएचओ, मसौरी पोलीस ठाणे

ट्रक आणि रिक्षाच्या धडकेत 7 ठार : या घटनेतील ऑटो रिक्षा पाटण्यातील मसौरीहून नौबतपूरकडं जात होता. यावेळी ऑटो रिक्षात तब्बल 10 मजूर प्रवास करत होते. यावेळी ऑटो रिक्षा आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या घटनेत 7 जण जागीच ठार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमी मजुरांना तत्काळ स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकरणाचा तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

"भीषण अपघातात 7 नागरिकांचा बळी गेल्याची अतिशय वेदनादायक घटना घडली आहे. आतापर्यंत सात जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. आम्ही रात्री उशिरापासून घटनास्थळी आहोत. सरकारनं मृतांच्या नातेवाईकांना 10 लाख रुपये मदत द्यावी." - रेखा देवी, आमदार, मसौरी
कामासाठी रोज पाटण्यात येत होते मजूर : ट्रक आणि ऑटो रिक्षाची ही धडक मसौरी पिटवन्स रस्त्यावरील नुरा बाजार कल्व्हर्टजवळ जोरदार टक्कर झाली. अपघातानंतर दोन्ही वाहनं रस्त्याच्या कडेला असलेल्या पाण्यात पडली. अपघातात ठार झालेले मजूर हे मसौरीहून ऑटोनं आपल्या गावी जात होते. हे मजूर कामासाठी दररोज पाटण्याला जात. त्यानंतर काम संपवून रात्री परत गावी जात असत. रविवारी रात्री हे मजूर परत गावी जाताना हा अपघात झाला, अशी माहिती मृतांच्या नातेवाईकांनी दिली.

'या' मजुरांचा झाला मृत्यू : मृतांपैकी 4 जण दोरीपार गावातील, 2 जण बेगमचकचे होते, तर चालक हांसडीह गावातील रहिवासी होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या अपघातात ठार झालेल्या मृतांची ओळख पटली आहे. सुशील राम, मेष बिंद, विनय बिंद, मतेंद्र बिंद, उमेश बिंद, उमेश बिंद आणि सूरज ठाकूर यांचा समावेश आहे. आठवा प्रवासी ट्रकखाली खोल पाण्याच्या खड्ड्यात अडकला असून त्याला वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही यावेळी सूत्रांनी दिली. घटनेची माहिती मिळताच मसौरीच्या आमदार रेखा देवी यांनीही घटनास्थळी धाव घेत प्रकरणाची माहिती घेतली. यावेळी त्यांनी ठार झालेल्या मजुरांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत देण्याची मागणी सरकारकडं केली.
काय म्हणाले पोलीस ? : मसौर्ही पोलिसांनी सांगितलं की, मसौर्ही पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नुरा पुलाजवळ ट्रक आणि टेम्पोमध्ये टक्कर झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचलं. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. पुढील कायदेशीर कारवाई केली जात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा :