अहिल्यानगर- जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतीने काल झालेल्या ग्रामसभेत एक ठराव सर्वानुमते मंजूर केलाय. या निर्णयाने राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे निर्माण झालीत. राज्यात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेली पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. मात्र यंदा या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केलाय.
मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकास दुकाने लावून देणार नाही : मढीच्या यात्रेला शेकडो वर्षांची परंपरा असून, हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. मढीची यात्रा अठरापगड जातींच्या भाविकांचे कुलदैवत म्हणून कानिफनाथांकडे बघितले जाते. मात्र यावर्षी मढी ग्रामस्थांनी ग्रामसभेत मोठा निर्णय घेतला असून, मढी जत्रेत एकही मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकास दुकाने लावून देणार नाही, असा धक्कादायक निर्णय ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतलाय.
हिंदू व्यावसायिकांना यात्रा काळात त्रास देण्याचे काम : मढी यात्रा ही महाराष्ट्र राज्यातील भटक्यांची पंढरी म्हणून ओळखली जाते. या यात्रेला अठरापगड जातीचे भाविक अन् भक्त दर्शनासाठी येत असतात. मात्र या ठिकाणी आलेल्या भक्तांना आणि ग्रामस्थांना काही ठराविक समाजाचा गेल्या काही वर्षांपासून बराच त्रास सुरू झाला असून, या समाजाकडून हिंदू व्यावसायिकांना यात्रा काळात त्रास देण्याचे काम होत असते. त्यामुळे ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे येथील ग्रामस्थ तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी भावना व्यक्त केलीय. मढी ग्रामपंचायतीच्या या निर्णयावर राज्य सरकार काय भूमिका घेते आणि प्रशासन यात हस्तक्षेप करते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा -
मढी यात्रेत मुस्लिम समाजाची दुकाने लागणार नाहीत, मढी ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक निर्णय - MUSLIM COMMUNITY SHOP BAN
पाथर्डी तालुक्यातील मढीतील चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. मात्र यंदा या यात्रेत मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेने संमत केलाय.

Published : Feb 24, 2025, 3:11 PM IST