थायरॉईड आजाराच्या लक्षणांमध्ये वजन कमी होणे, जास्त घाम येणे, हृदयाचे ठोके जलद होणे, थंडी वाजून येणे, कोरडी त्वचा, बद्धकोष्ठता, चेहऱ्यावर सूज येणे, स्नायू दुखणे, केस गळती, नैराश्य यांचा समावेश आहे. तज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा थायरॉईड ग्रंथी शरीराच्या गरजेपेक्षा जास्त थायरॉईड संप्रेरक तयार करते तेव्हा हायपरथायरॉईडीझम होतो. तसंच जेव्हा थायरॉईड ग्रंथी गरजे पेक्षा कमी थायरॉई़ड संप्रेरक तयार करते तेव्हा हायपोथायरॉईडीझम होतो. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये थायरॉईड होण्याचं प्रमाण जास्त आहे.
- लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता: तज्ञांच्या म्हते, थायरॉईड ग्रंथी मेंदूला काही विशिष्ट हार्मोन्स पाठवते. हे मेंदूच्या कार्यात सहभागी असल्याचे म्हटले जाते. हायपोथायरॉईडीझममध्ये, अशा संप्रेरकांचा प्रवाह मंदावतो, ज्यामुळे एकाग्रता कमी होते, विसर पडतो आणि योग्यरित्या विचार करण्यास असमर्थता येते 1019 मध्ये युरोपियन थायरॉईड जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या "सामान्य लोकसंख्येतील थायरॉईड लक्षणांची व्यापकता" या अभ्यासातही हे आढळून आलं आहे.
- मूड स्विंग्स: असं म्हटलं जातं की, थायरॉईडच्या समस्येच्या लक्षणांमध्ये दुःख, नैराश्य, चिंता आणि उदासीनता यांचा समावेश होतो. खरं तर थायरॉईड असलेल्या अनेक लोकांना नैराश्य आणि चिंता यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. हायपोथायरॉईडीझममध्ये अशी लक्षणं सामान्य असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
- चेहऱ्यावर सूज: तज्ञांचं म्हणणं आहे की, जर चेहरा सुजलेला आणि फुगलेला दिसत असत असेल तर ते थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या कार्य करत नसल्याचे लक्षण आहे. कारण जर थायरॉई ग्रंथीचं कार्य मंदावले तेव्हा शरीरातील द्रवपदार्थ योग्यरित्या बाहेर पडत नाहीत. त्यामुळे पापण्या, ओठ आणि जीभ सुजलेली दिसते.
- धूसर दृष्टी: काही लोकांमध्ये, थायरॉईड आजारामुळे डोळ्यांभोवती असलेल्या ऊतींमध्ये जास्त द्रव जमा होतो. परिणामी, डोळ्यांना नियंत्रित करणारे स्नायू मोठे होतात. याचा अर्थ असा की ते योग्यरित्या लक्ष केंद्रित करू शकत नाहीत आणि त्यांची दृष्टी अंधुक होऊ शकते.
- चव बदलणे: तज्ञांचं म्हणणं आहे की, अन्नाची चव जाणण्याच्या क्षमतेमध्ये जिभेसह मेंदू देखील महत्त्वाचा असतो. जर थायरॉईड ग्रंथीची गती मंदावली तर तिचे कार्य देखील विस्कळीत होते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की परिणामी, पदार्थांची चव बदलते.
- कामवासना कमी होणे: असं म्हटलं जातं की, जर थायरॉईड योग्यरित्या कार्य करत नसेल तर चयापचय मंदावतो. याचा परिणाम लैंगिक संप्रेरके सोडणाऱ्या अवयवांवर नाट्यमय परिणाम होऊ शकतो. परिणामी, सेक्समधील रस कमी होतो.
- पचनाच्या समस्या: तज्ञांचं म्हणणं आहे की, जर थायरॉईड मंदावले तर पचन आणि आतड्यांची हालचाल देखील मंदावते. परिणामी, यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते हे उघड झालं आहे. जर थायरॉईड जास्त सक्रिय असेल तर तुम्हाला पाण्यासारखा अतिसार आणि वारंवार अतिसार होऊ शकतो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ
https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6822815/