महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

कान्स 2024 मध्ये भारताचा डंका, अनसूयानं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून रचला इतिहास - Cannes 2024 - CANNES 2024

ANASUYA SENGUPTA BEST ACTRESS : अनसूया सेनगुप्ता या भारतीय अभिनेत्रीने कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून भारतासाठी इतिहास रचला आहे.

ANASUYA SENGUPTA
अनसूया सेनगुप्ता ((A still from film/ETV Bharat))

By ETV Bharat Marathi Team

Published : May 25, 2024, 12:21 PM IST

मुंबई - ANASUYA SENGUPTA BEST ACTRESS : भारतीय अभिनेत्री अनसूया सेनगुप्तानं कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये इतिहास रचला आहे. कान्स 2024 मध्ये यूएन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये अनसूयाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. तिला 'शेमलेस' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. 'शेमलेस' या चित्रपटाचं दिग्दर्शन बल्गेरियन चित्रपट दिग्दर्शक कॉन्स्टँटिन बोजानोव्ह यांनी केलं आहे. कान्समध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकणारी अनसूया ही पहिली भारतीय अभिनेत्री ठरली आहे. अनसूयाने हा ऐतिहासिक पुरस्कार 'समलिंगी समुदाय आणि जगभरातील इतर उपेक्षित समुदायांना धैर्यानं लढल्याबद्दल समर्पित केला आहे.

अभिनेत्री असण्याबरोबरच अनसूया ही एक कुशल प्रॉडक्शन डिझायनर देखील आहे. अनुसया मुंबईच्या सिनेवर्तुळात प्रॉडक्शन डिझायनर म्हणून ओळखली जाते. सध्या ती गोव्यात राहते. अनसूयाने ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता आणि तिची मुलगी मसाबा गुप्ता यांच्या नेटफ्लिक्स शो मसाबा-मसाबाचा सेट तयार केला होता. मूळची कोलकात्याची असलेल्या अनसूयाने जाधवपूर विद्यापीठातून (कोलकाता) शिक्षण घेतलं आहे.

कान्स 2024 साठी गेलेला 'द शेमलेस' हा भारतीय कलाकारांचा चित्रपट आहे, जो कान्सला गेला होता. यावेळी कान्समध्ये 10 हून अधिक भारतीय कलाकारांचे चित्रपट कान्स 2024 मध्ये आपली ताकद दाखवण्यासाठी गेले आहेत. 'द शेमलेस' या चित्रपटाला कान्स येथील यूएन सरटेन रिगार्ड विभागात नामांकन मिळाले होते. या चित्रपटाची कथा भारतातील दोन महिलांभोवती फिरते. हा चित्रपट दोन भारतीय महिलांची कथा आहे ज्या त्यांच्या परिस्थितीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहेत.

कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मधील विजेत्यांची संपूर्ण यादी

  • तौफिक अलझैदी - पहिला चित्रपट
  • युवा पुरस्कार-हॉली काउ (लुईस कॉर्वाशियर) पहिला चित्रपट
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अनसूया सेनगुप्ता (द शेमलेस)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता - अबू संगरे (L'Histoire de Souleymane)
  • सर्वोत्कृष्ट डायरेक्टर एक्स-ऍकिओ - रॉबर्टो मिनर्विनी (द डॅम्ड), रुंगानो न्योनी - ऑन बिकम अ गुयानी

ABOUT THE AUTHOR

...view details