महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातील जस्टिन बीबरनं शेअर केले खास फोटो आणि व्हिडिओ - Anant Radhika Sangeet Nigh - ANANT RADHIKA SANGEET NIGH

Anant Radhika Sangeet Night: 'बेबी' हिटमेकर जस्टिन बीबरनं अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या संगीत सोहळ्यातील न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तो अंबानी कुटुंबाबरोबर खास क्षण घालवताना दिसत आहे.

Anant Radhika Sangeet Night
अनंत आणि राधिका संगीत सोहळा (जस्टिन बीबर- अनंत अंबानी-राधिका मर्चेंट (ANI))

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 12:02 PM IST

मुंबई - Anant Radhika Sangeet :अभिनेत्री अनंत राधिकाचा संगीत सोहळा 5 जुलै रोजी मोठ्या थाटात पार पडला. यात सलमान खान, विकी कौशल, अनन्या पांडे, रितेश जेनेलिया, पूजा हेगडे, सिद्धार्थ कियारा यांसारखे अनेक स्टार्स सहभागी झाले होते. आता अलीकडेच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये नीता अंबानी राधिका मर्चंट आणि ईशा अंबानी, श्लोका अंबानी यांच्याबरोबर सुंदर डान्स सादर करत आहेत. या तिघींनी सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्राच्या 'ड्रामा क्वीन' या गाण्यावर शानदार डान्स परफॉर्मन्स दिला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे जस्टिन बीबरचा परफॉर्मन्स होता. या संगीत सोहळ्यात त्यानं 'बेबी', 'नेव्हर लेट यू गो,' 'लव्ह युवरसेल्फ', 'पीचेस', 'बॉयफ्रेंड', 'सॉरी' आणि 'व्हेअर आर यू नाऊ' अशी ही गाणी गायली.

अनंत आणि राधिकाचा संगीत सोहळा :मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये त्याच्या परफॉर्मन्सनंतर लगेचच जस्टिन बीबरचे सोशल मीडियावर अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जस्टिननं त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अनंत आणि राधिकाबरोबर न पाहिलेली फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत जस्टिन या जोडप्याबरोबर पोझ देताना दिसत आहे. यानंतर पुढील फोटोमध्ये, तो श्लोका मेहता अंबानी, दिया मेहता, आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि तिचे पती आनंद पिरामलबरोबर बॅकस्टेजवर दिसत आहे. याशिवाय त्यानं परफॉर्मन्सची रिहर्सल करताना आणि स्टेजवर साऊंडचेक करत असल्याची क्लिपही शेअर केल्या आहेत. दरम्यान याशिवाय जावेद जाफरीची मुलगी अलविया जाफरीनं देखील स्टेजवरून जाऊन जस्टिन बीबरला मिठी मारली. यानंतर तीदेखील चर्चेत आली आहे.

12 जुलै रोजी लग्न होईल : रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी राधिका मर्चंटबरोबर 12 जुलै रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये विवाह करणार आहे. पहिला समारंभ शुभ विवाह सोहळा असेल, यामध्ये ड्रेस कोड भारतीय पारंपारिक पोशाख आहे. 13 जुलै आशीर्वादाचा दिवस असेल. 14 जुलै रोजी मंगल उत्सव आणि लग्नाचा रिसेप्शन असणार आहे.

हेही वाचा :

  1. 'मुंज्या' चित्रपटात कोल्हापूरच्या आयुष उलगड्डेचा धुमाकूळ, अभिनयाची कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना कसं मिळविल यश? - munjya film News
  2. 'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर 9 दिवसात छप्परफाड कमाई - Kalki 2898 AD Box Office Collection
  3. रणवीर सिंगच्या वाढदिवसानिमित्त जाणून घ्या त्याच्या विशेष चित्रपटांबद्दल... - ranveer singh birthday

ABOUT THE AUTHOR

...view details