मुंबई- Pushpa Pushpa song : साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुन सध्या त्याचा आगामी चित्रपट 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामुळे चर्चेत आहे. आता चाहते या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेनं वाट पाहत आहेत. नुकतेच 'पुष्पा 2 द रुल' चित्रपटामधील 'पुष्पा-पुष्पा' पहिलं गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं तेलुगू आणि हिंदीसह 6 भाषांमध्ये रिलीज करण्यात आलं आहे. 'पुष्पा-पुष्पा'मधील अल्लू अर्जुनचा डान्स हा खूप लोकप्रिय झाला आहे. अल्लूच्या तीन लोकप्रिय स्टेप्स आहेत. यामध्ये शूज, चहा आणि मोबाईल स्टेप्सचा देखील समावेश आहे. आता 'पुष्पा-पुष्पा' हे गाणं यूट्यूबवर धुमाकूळ इतिहास रचताना दिसत आहे.
'पुष्पा-पुष्पा' गाण्यानी रचला इतिहास : 'पुष्पा-पुष्पा' हे गाणं देशांतर्गतच नाही तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांमध्येही हिट आहे. आता 'पुष्पा-पुष्पा' या गाण्यानं एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. 'पुष्पा-पुष्पा' हे 6 भाषांमध्ये 50 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवणारे पहिलं गाणं ठरलं आहे. याशिवाय इंस्टाग्रामवर या गाण्यावर 1 लाखांहून अधिक रील्स बनवण्यात आल्या आहेत. आता या गाण्याच्या यशामुळे 'पुष्पा 2 द रुल'च्या निर्मात्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये एक आकडा नमूद केला आहे. 'पुष्पा-पुष्पा' गाणं तेलुगू आणि हिंदीबरोबर तामिळ, कन्नड, मल्याळम आणि बंगाली भाषांमध्येही प्रदर्शित झालं आहे. आता हे गाणं अनेकांना खूप आवडत आहे.