मुंबई :2024वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा 2'नं बॉक्स ऑफिसवर राज्य केलं होतं. या चित्रपटानं भारतात 800 कोटी आणि जगभरात 1800 कोटींचा टप्पा ओलांडला होता. 'पुष्पा 2' चित्रपटाला जबरदस्त यश मिळालं आहे. हा चित्रपट 30 जानेवारी रोजी ओटीटी प्लेटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. आता 'पुष्पा 2' चित्रपट ओटीटीवरही विक्रम मोडून जागतिक स्तरावर ट्रेंड करत आहे. 'पुष्पा 2'च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. यामध्ये चित्रपटाच्या जबरदस्त यशाची घोषणा केली गेली आहे. यात त्यांनी म्हटलंय, 'बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालल्यानंतर 'पुष्पा 2: द रुल' आता जागतिक स्तरावर नेटफ्लिक्सवर ट्रेंड करत आहे. सर्वत्र प्रचंड कौतुक होत आहे.'
नेटफ्लिक्सवर 'पुष्पा 2: द रुल' करत आहे राज्य : सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2'मध्ये अल्लू अर्जुन, रश्मिका मंदान्ना आणि फहाद फासिल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती मैत्री मूव्ही मेकर्स आणि सुकुमार रायटिंग्ज यांनी केली आहे. 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाचे संगीत टी-सीरीजनं दिलं आहे. हा चित्रपट 5 डिसेंबर 2024 रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज झाला होता. यानंतर आता 'पुष्पा 2: द रुल' नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होत आहे. हा चित्रपट अनेकांना पसंत पडला आहे. या चित्रपटामध्ये अल्लू अर्जुननं धमाकेदार अॅक्शन केली आहे. तसेच 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटामधील गाणी देखील खूप लोकप्रिय झाली आहेत. 'पुष्पा 2' हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे.