मुंबई : भारताच्या गायन कोकिळा लता मंगेशकर यांचा आज स्मृतिदिन आहे. 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदूर येथे जन्मलेल्या लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज आपल्यात लतादीदी नसल्या तरी, त्यांच्या आवाजानं त्या आजही सर्वांच्या मनात जिवंत आहेत. त्यांच्या स्मृतिदिननिमित्त, आम्ही तुम्हाला त्यांच्याशी संबंधित काही विशेष गोष्टी सांगणार आहोत. लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजानं जगभरात भारताचं नाव केलं आहे. त्यांचं भारतीय चित्रपटसृष्टीत खूप मोठ योगदान आहे. त्यांनी फक्त हिंदी चित्रपटसृष्टीसाठी नाहीत तर 14 भाषांमधील गाण्यांना आपला आवाजही दिला आहे. लता मंगेशकर त्यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात 50 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली आहेत.
लता मंगेशकर याच्या आयुष्यातील वाईट काळ : यामुळे त्यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवलं गेलं आहे. सुमन चौरसिया यांच्या 'लता समग्र' या पुस्तकात 2014 पर्यंत लतादीदीनं गायलेल्या गाण्यांची यादी दिली गेली आहे. लतादिदीनं मराठी, बंगाली, पंजाबी, संस्कृत आणि गुजराती या भाषांमध्ये गाणी गायली आहेत, त्यांचे लाखो चाहते आहेत. लता मंगेशकर या नेहमीच पांढऱ्या साडीमध्ये दिसत होत्या. लता मंगेशकर यांनी स्वतःच खुलासा केला होता की, त्या फक्त पांढऱ्या रंगाची साडी का घालतात. यावर त्यांनी सांगितलं होतं की, त्यांना लहानपणापासूनच पांढरा रंग आवडत होता. याशिवाय त्यांनी आणखी एक खुलासा केला होता की, कोणीतरी एकदा त्यांना विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी त्या 33 वर्षांच्या होत्या. त्यांना स्लो पॉयझन दिलं गेलं होतं. हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट काळ होता.
लता मंगेशकर यांनी शहीद झालेल्या सैनिकांसाठी गायलं होतं गाणं : लता मंगेशकर यांना लहानपणापासून संगीताची आवड होती. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी गायला सुरुवात केली. 1938 मध्ये, वयाच्या नऊव्या वर्षी लता मंगेशकर यांनी सोलापूर येथील नूतन थिएटरमध्ये त्यांचा पहिला सार्वजनिक कार्यक्रम सादर केला होता. यानंतर त्यांनी 1942मध्ये 'किती हसाल' या मराठी चित्रपटासाठी त्यांचं पहिलं गाणं रेकॉर्ड केलं होतं. या चित्रपटातून 'नाचू या गडे, खेलू सारी मनी हौस भारी' हे गाणं काढून टाकलं होतं. लता मंगेशकर यांनी कधीही स्वतःची गाणी ऐकली नाहीत, असं त्यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. कारण त्यांना त्याच्या गाण्यात अनेक त्रुटी आढळतात. दरम्यान लता मंगेशकर यांनी 'ए मेरे वतन के लोगों' हे गाणं 1962 च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना समर्पित केलं होतं. 27 जानेवारी 1963 रोजी नवी दिल्लीतील रामलीला मैदानात त्यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीतानं पंतप्रधान नेहरूंना अश्रू अनावर झाले होते. लता मंगेशकर यांनी प्रतिष्ठित रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये लाईव्ह सादरीकरण केलं आहे. त्या हे करणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या होत्या. आंतरराष्ट्रीय रंगमंचावर हा त्याचा पहिलाच कार्यक्रम होता.
हेही वाचा :
- लतादीदींनी दिला अनेक पिढ्यांच्या हृदयाला भिडणाऱ्या कालातीत गाण्यांचा वारसा - Lata Mangeshkar Birth Anniversary
- ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर - singer Anuradha Paudwal
- यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर; अमिताभ बच्चन ठरले पुरस्काराचे मानकरी - Lata Mangeshkar Award