ETV Bharat / health-and-lifestyle

आपण फेकून देतो 'या' फळाच्या बिया; मधुमेह ग्रस्तांसाठी वरदानापेक्षा कमी नाही - JAMUN SEED POWDER BENEFITS

अनेक लोक मधुमेहानी त्रस्त आहेत. कारण या आजाराचं निदान झाल्यास तो शेवटपर्यंत साथ सोडत नाही. परंतु काही घटक प्रीडायबिटीक आणि मधुमेह ग्रस्तांसाठी फायदेशीर आहेत.

BENEFITS OF JAMUN POWDER  JAMUN POWDER GOOD FOR PREDIABETES  JAMUN FRUIT SEED POWDER BENEFITS
जांभळीच्या बिया मधुमेह ग्रस्तांसाठी फायदेशीर (FREEPIK)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Feb 6, 2025, 1:36 PM IST

Jamun Seed Powder Benefits: आजच्या काळात मधुमेह हा एक अतिशय गंभीर आजार बनला आहे. देशातील आणि जगातील कोट्यवधी लोक या आजारानं ग्रस्त आहेत. हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो. मधुमेह एकदा एखाद्याला झालास तो आयुष्यभर साथ सोडत नाही. अशा परिस्थितीत मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची आणि जीवनशैलीची विशेष काळजी घ्यावी लागते. जर मधुमेहाच्या रुग्णांनी हे केले नाही तर अनेक आजार जळण्याची दाट शक्यता असते. विशेष म्हणजे रक्तातील साखर नियंत्रणात नसल्यास मृत्यू देखील होऊ शकतो. यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तीने केवळ आहाराकडेच नव्हे तर व्यायाम आणि चालणे यासारख्या क्रियाकलापांकडे देखील विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. परंतु काही फळांच्या बीयांचा पावडरचे सेवन केल्यास मधुमेह नियंत्रणात ठेवता येतं. चला तर जाणून घेऊया त्या बिया प्रीडायबिटीज आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहेत का?

बरेच लोक जांभळाचे फळ खातात आणि बिया फेकून देतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, या फळाच्या बिया मधुमेह रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. जांभळाच्या बिया खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत असं तज्ञांचं म्हणणे आहे. जांभळाच्या बियांमध्ये फायबर, प्रथिने, ओमेगा ३, ओमेगा ६ सारखे फॅट्स, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फ्लेव्होनॉइड्स, जांबोलिन आणि जांबुसिन सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे पोषक तत्व अनेक आरोग्यदायी फायदे प्रदान करतात.

प्रीडायबिटीक आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी जांभूळ खाण्याचे फायदे

जांभळाच्या बिया प्रीडायबिटीज असलेल्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतात. कारण ते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. जांभळाच्या बियांमध्ये बायोएक्टिव्ह संयुगे असतात. जे हायपरग्लाइसेमियामध्ये मदत करतात. प्रीडायबिटीज ही अशी स्थिती आहे जिथे रक्तातील साखरेची पातळी थोडीशी वाढलेली असते.

तज्ञांचे म्हणणे आहे की, प्रीडायबिटीज असलेल्या लोकांनी जांभळासोबत जांभळाच्या बियांचा पावडर खाल्ल्यास मधुमेह नियंत्रित करता येते. कारण त्यामध्ये असलेले जाम्बोलिन आणि जाम्बुसिन संयुगे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात. २०१३ मध्ये डायबिटीज केअर या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असं आढळून आलं की, टाइप २ मधुमेह असलेल्या लोकांनी १२ आठवडे दिवसातून दोनदा ५०० मिलीग्राम जांभळाची पावडर घेतली. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी आणि हिमोग्लोबिन A1C पातळी लक्षणीयरीत्या कमी झाली. डॉ. सुजीत शर्मा, एंडोक्राइनोलॉजीचे प्राध्यापक तसेच या संशोधनात दिल्लीतील एम्सनेही भाग घेतला.

  • जांभळाची पावडर खाण्याचे फायदे
  • यकृताचे आरोग्य सुधारते: यकृताच्या चांगल्या आरोग्यासाठी नियमितपणे जांभळाच्या बियांचा पावडर खाण्याची शिफारस तज्ञ करतात. असं म्हटलं जाते की, त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स यकृत निरोगी ठेवतात.
  • पचन सुधारते: जांभळाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. असं म्हटलं जाते की, ते पचन सुधारते, बद्धकोष्ठता रोखते आणि वजन कमी करण्यास देखील मदत करते.
  • रोगप्रतिकारक शक्ती वाढवते: जांभळाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सर्दी आणि फ्लू सारख्या संसर्गांशी लढण्यास मदत करतात.
  • हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले: जांभळाच्या बियांमध्ये असलेले फायबर, फ्लेव्होनॉइड्स, जांबोलिन इत्यादी शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात आणि चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवतात असं तज्ञांचं म्हणणं आहे. असं म्हटलं जाते की, यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि स्ट्रोकसारख्या समस्या कमी होतील.
  • हाडांच्या आरोग्यासाठी: जांभळाच्या बियांमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखी खनिजे भरपूर असतात. हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. असं म्हटलं जातं की, हे खनिजं हाडांची घनता वाढविण्यास आणि ऑस्टियोपोरोसिस सारख्या हाडांच्या आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.
  • त्वचेचे आरोग्य: जांभळाच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात. असे म्हटले जाते की ते मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात आणि सुरकुत्या कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहेत.
  • केसांच्या वाढीसाठी: जांभळाच्या बियांमध्ये प्रथिने, लोह आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, असे म्हटले जाते की हे पोषक घटक केसांच्या वाढीस चालना देतात आणि केस गळती रोखतात.
  • कसं खावं: तज्ञांच्यामते, बिया थेट खाण्यापेक्षा त्यांचा पावडर तयार करून खाणं फायदेशीर आहे.
  • जांभळाच्या काही बिया घ्या आणि त्या वाळवा.
  • पूर्णपणे वाळल्यानंतर त्यांचा बारीक पावडर तयार करा
  • चांगल्या परिणामासठी पावडर पाण्यात किंवा दुधात मिसळून पिणं चांगलं.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC10057433/

हेही वाचा

  1. मधुमेह ग्रस्तांनी पपईचं सेवन करावे का? तज्ञांनी सांगितले फायदे आणि तोटे
  2. मधुमेह ग्रस्तांसाठी आनंदाची बातमी! रक्तातील साखर कमी करण्यासाठी वापरा 'ब्लॅक कॉफी'
  3. अभिनेत्री आलिया भटच्या आहारातज्ज्ञांनी दिल्या मधुमेह नियंत्रित करण्याच्या टीप्स; मधुमेह रुग्णांनी आजच फॉलो करा 'या' टिप्स
  4. मधुमेह ते कर्करोग ग्रस्तांसाठी 'ही' भाजी आहे फायदेशीर
  5. पुरुषांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाबाचं प्रमाण का वाढतं? नियंत्रणासाठी काय कराल? प्रतिबंधात्मक उपाय वाचा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.