ETV Bharat / state

धनंजय मुंडेंसंदर्भात माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार, ॲड. सायली सावंतांनी स्पष्टच सांगितलं - KARUNA MUNDE ALLEGATIONS

काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनंजय मुंडेंच्या वकील ऍड. सायली सावंत यांनी स्पष्ट केलंय.

Maharashtra Food and Civil Supplies Minister Dhananjay Munde
राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2025, 3:50 PM IST

बीड- मुंबई न्यायालयाने कौटुंबिक हिंसाचार प्रकरणी करुणा शर्मा यांनी केलेल्या अर्जावर 04 फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात कोणताही अंतिम निष्कर्ष काढलेला नाही. अर्जदार करुणा शर्मा आणि त्यांची मुलगी शिवानी यांची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि अन्य निकषांच्या आधारे त्यांना अंतरिम देखभालीसाठी मिळून 02 लाख रुपये (अर्जदार क्र. 01 यांना 1.25 लाख, तर अर्जदार क्र.03 यांना 75 हजार रुपये प्रति महिना) पोटगी म्हणून देण्याचा अंतरिम निर्णय दिलाय.

करुणा यांच्या आरोपांवर अद्याप निर्णय नाहीय- सावंत : धनंजय मुंडे यांच्या वरील आरोपांच्या अनुषंगाने किंवा कौटुंबिक हिंसाचाराच्या अनुषंगाने कोणत्याही आरोपांवर काहीही निर्णय अद्याप दिलेला नसून, याबाबत काही माध्यमांवर दाखविण्यात येत असलेले वार्तांकन निराधार आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे धनंजय मुंडेंच्या वकील ऍड. सायली सावंत यांनी स्पष्ट केलंय. धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपल्या व्यक्तिगत आयुष्याबाबत याआधी जाहीर खुलासा करत ते करुणा शर्मा आणि मुले यांच्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहिल्यासंदर्भात त्यांनी यापूर्वीच कबुली दिलेली असून, आजच्या अंतरिम आदेशाला त्याचाच आधार असल्याचे वकील सायली सावंत यांनी स्पष्ट केलंय.

माध्यमांनी खोट्या वार्तांकनापासून दूर राहावे- सावंत : ऍड.सायली सावंत यांनी याबाबत माध्यमांनासुद्धा विनंती केली असून, सर्व माध्यमांनी जबाबदार आणि अचूक वार्तांकन करावे, तसेच न्यायालयाच्या अंतरिम आदेशावर आधारित कोणतीही दिशाभूल करणाऱ्या किंवा खोट्या वार्तांकनापासून दूर राहावे, कुणाचीही नाहक बदनामी होईल, असे चुकीचे वार्तांकन करू नये. कुठल्याही माध्यम प्रतिनिधींना याबाबत अधिक माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास ते वकिलांकडे मागावे, असे आवाहन ऍड. सायली सावंत यांनी केलंय.

Explanation from Dhananjay Munde's lawyer Adv. Sayali Sawant
धनंजय मुंडेंच्या वकील ॲड. सायली सावंत यांचं स्पष्टीकरण (Source- ETV Bharat)

नेमकं प्रकरण काय? : करुणा शर्मा यांनी राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयात पोटगीसाठी आणि घरगुती हिंसाचारासंदर्भात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी न्यायालयाने त्यांची याचिका अंशत: स्वीकारली. करुणा शर्मा यांना पोटगीसाठी दरमहा 1 लाख 25 हजार रुपये आणि मुलगी शिवानी हिच्या खर्चासाठी दरमहा 75 हजार रुपये धनंजय मुंडे यांनी द्यावेत, असे निर्देश न्यायालयाने दिलेत. करुणा मुंडे यांनी स्वत:साठी 5 लाख, मुलीसाठी 5 लाख आण‍ि मुलासाठी 5 लाख अशी 15 लाख रुपयांची पोटगी माग‍ितली होती. मात्र, मुलगा 18 वर्षांचा असल्यामुळे तो पोटगीसाठी पात्र ठरत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. तर, करुणा यांना 1.25 लाख आण‍ि मुलीसाठी 75 हजार रुपयांची दरमहा पोटगी न्यायालयाने मंजूर केलीय.

हेही वाचाः

Karuna Sharma : करुणा शर्मांनी घेतलं बीडमध्ये घर... आता इथून खरी लढाई सुरू...!

धनंजय मुंडे खंडणी प्रकरण: रेणू शर्मा विरोधात आरोपपत्र दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.