Daily Bathing Is Good Heath: आपल्यापैकी बरेच जण दररोज अंघोळ करतात. काही लोक दुर्गंधी येते म्हणून आंघोळ करतात तर काही लोक सकाळी उठल्यानंतर त्यांच्या दिनचर्येचा भाग म्हणून आंघोळ करतात. तज्ञांच्या मते, ठिकाणानुसार ही सवय बदलते. अमेरिकेत दोन तृतीयांश लोक दररोज आंघोळ करतात. तर ऑस्टेलियामध्ये 80 टक्के लोक असं करतात. चीनमधील अर्ध्याहून अधिक लोक आठवड्यातून फक्त दोनदा आंघोळ करतात. भारतातील लोक मात्र, दररोज आंघोळ करण्याला प्राध्यान्य देतात. चला तर पाहूया आठवड्यातून किती दिवस आंघोळ करणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- तज्ञांच्या मते, सामान्यत: त्वचेच्या संरक्षणासाठी आपल्या त्वचेवर नैसर्गिक तेलाचा थर असतो. तसंच त्वचेवर चांगले बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव देखील असतात. परंतु, वारंवार आंघोळ केल्यानं आणि शरीर घासल्यानं हे घटक नाश पावतात. विशेषत: आंघोळीसाठी गरम पाण्याचा वापर केल्यास त्वचेला प्रोटेक्ट करणारे हे घटक नष्ट होतात. त्वचेचे संरक्षण करणारे हे घटक नष्ट झाल्यास त्वचा कोरडी, अस्वस्थ आणि त्यावर खाज सुटू शकते. तसंच गरम पाण्यामुळे त्वचेला भेगा पडतात आणि शरीरामध्ये खराब बॅक्टेरिया जाण्याची शक्यता वाढते. परिणामी त्वचेसंबंधित समस्या आणि ऍलर्जीचा धोका वाढतो. असं २०१८ मध्ये जर्नल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह डर्मेटोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या "त्वचेच्या नैसर्गिक ओलावा अडथळ्यावर दररोज आंघोळीचे परिणाम" मध्ये प्रकाशित झालं आहे.
तज्ञांच्या मते, आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या अँटीबॅक्टेरियल साबणांमुळे चांगले बॅक्टेरिया नष्ट होतात. जे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहेत. वारंवार आंघोळ करणे आणि शरीर स्वच्छ करणे या सवयी फायद्यांव्यतिरिक्त त्वचेच्या समस्या निर्माण करू शकतात. यामुळे वारंवार आंघोळ न करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तज्ञांच्या मते, आंघोळीसाठी वापरल्या जाणाऱ्या गरम पाण्यामुळे तसंच तेल, साबण आणि शाम्पूमुळे ॲलर्जी होऊ शकते.
- दिवसातून किती दिवस आंघोळ करावी? तज्ञांच्या मते, आंघोळीसाठी विशिष्ट कालावधी नाही. काही डॉक्टरांच्या मते नियमित आंघोळ करावी. तर काहींच्या मते, आठवड्यातून दोन किंवा तीनवेळा आंघोळ करणे पुरेसे आहे.
- किती मिनिटं आंघोळ करावी? आपल्यापैकी बऱ्यांच जणांना जास्त वेळ आंघोळ करणे आवडते. कुणी 15 मिनिटं आंघोळ करतात तर कुणी 30 मिनिटे. परंतु पाण्यात जास्त वेळ घालवणे केवळ त्वचेसाठीच नव्हे तर केसांच्या आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे. तज्ञांच्या मते, नियमित 3 ते 5 मिनिटे आंघोळ करणं पुरेसे आहे. तसंच शरीराच्या प्रत्येक भागाला घासण्यापेक्षा काख आणि चेहरा यासारख्या भागांवर लक्ष केंद्रित करा.
- रोज शॅम्पू करावी काय? तज्ञांच्या मते, दररोज शाम्पू करण्याची गरज नाही. आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा आंघोळ करणे पुरेसे आहे. केस जास्त तेलकट होत असतील तर जास्त वेळा केस धुवावे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ