ठाणे : जिल्ह्यात तब्बल ३१.७५ लाख रुपयांच्या बंदी घातलेल्या कफ सिरपच्या बाटल्या बेकायदेशीरपणे बाळगल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी पाच जणांचा अटक करण्यात आली आहे. यातील सर्व आरोपी २४ ते २५ वर्षाचे असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पाच जणांना अटक : कोडीनयुक्त कफसिरप आणि औषधाचा साठा बेकायदेशीर विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्ता गुन्हे शाखा ठाणे शहर वपोनि गोरखनाथ घार्गे यांच्या पोलीस पथकाने ओवळी गावाकडं जाणाऱ्या रोडवर सापळा रचला आणि १७ हजार ६४० बाटल्या जप्त करून पाच जणांना अटक केली. तर दिलीप हरिराम पाल (२८), दिनेशसिंग चेतनारायण सिंग (४५), शामसुंदर रविशंकर मिश्रा (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत.
कफ सिरपच्या १७१६० बाटल्या : नशेसाठी वापरण्यात येणारे ऑनरेक्स कंपनीचे कोडीनयुक्त कफ सिरपच्या ४ बॉक्समध्ये ४८० बाटल्या आणि ८ लाख किंमतीची मारुती कंपनीची डिजायर कार आढळून आल्यानं पोलिसांनी पाचही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतलं. तसंच चौकशीत आरोपीचा साथीदार इकबाल साजन शेख (४०) याने जय मातादी कमर्शियल को.ऑ. सोसायटी प्लॉट नं. ४६ जी मधील गाळा नं.५ कुंभारवाडा, एस.टी. रोडवरील सिंधी कॉलनी सोसायटी समोर बेकायदेशीर आणि विनापरवाना विक्री करण्यासाठी बाळगलेल्या कोडीनयुक्त कफसिरपच्या १७ हजार १६० बाटल्या आढळल्या. या प्रकरणी पोलीस पथकानं इकबाल शेखलाही अटक केली. दोन्ही ठिकाणी केलेल्या कारवाईत १४७ बॉक्समध्ये १७ हजार ६४० बाटल्या ३१ लाख ७५ हजार २०० रुपयांचा कोडीनयुक्त कफसिरपचा साठा पोलिसांनी हस्तगत केला. त्याचप्रमाणे वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १२ लाखाचा टाटा कंपनीचा ट्रक हस्तगत केला. तर पाचही आरोपींच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आलेली आहे.
हेही वाचा -
- Government Medicine in Garbage : शासकीय औषधाचा साठा कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, श्रमजीवी संघटनेमुळे प्रकार आला समोर
- Oxytocin Injection Manufacturing : ऑक्सिडोसिन इंजेक्शन उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर धाड; 52 लाखांचा माल जप्त
- Illegal Drug Stock Seized : गर्भनिरोधक गोळ्यांसह अवैध औषधाचा मोठा साठा जप्त, दोघांना घेतले ताब्यात