नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत बोलले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.
मोदींनी केला काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल : "लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांवरील कविता आकाशवाणीवर सादर करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना काँग्रेस सरकारनं आकाशवाणीतून कायमचं हद्दपार केलं होतं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस सरकारविरुद्ध निषेध केल्यामुळं अनेक अभिनेते, कलाकार, कवी यांना काँग्रेसनं तुरुंगात टाकलं होतं, असं म्हणत मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
Rajya Sabha | PM Modi says " during nehru ji's tenure as the pm, a workers strike was held in mumbai. during that strike, the famous poet majrooh sultanpuri recited a poet. after this, he was put in jail. famous actor balraj sahni was also jailed only because he participated in a… pic.twitter.com/xRK7LxJaxc
— ANI (@ANI) February 6, 2025
काँग्रेसनं अभिनेते, कवींना टाकलं होतं तुरुंगात : "नेहरू पंतप्रधान असताना मुंबईत कामगारांचा संप झाला होता. त्या निषेधार्थ प्रसिद्ध गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी एक गाणं गायलं होतं. या गाण्यामुळं नेहरूजींनी त्यांना तुरुंगात पाठवले," असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, "प्रसिद्ध अभिनेते बलराज साहनी यांना आंदोलनात सहभागी झाल्यामुळे अटक करण्यात आली होती. सावरकरांवर कविता चालवण्याची योजना आखल्याबद्दल लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांना आकाशवाणीतून काढून टाकण्यात आलं होतं."
वृत्तपत्रांवर निर्बंध लादले : "काँग्रेस सरकारनं त्यावेळी भाषण स्वातंत्र्यावर अंकुश लावला होता. त्यांनी वृत्तपत्रांवर निर्बंधही लादले होते," असं म्हणत कामगारांच्या संपाला पाठिंबा दिल्याबद्दल प्रसिद्ध कवी मजरूह सुलतानपुरी यांना तुरुंगात पाठवल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी नेहरूंच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारवर राज्यसभेत बोलताना हल्ला चढवला.
हेही वाचा -