नागपूर IND vs ENG 1st ODI Live : भारत आणि इंग्लंड क्रिकेट संघातील वनडे मालिका आजपासून म्हणजेच 6 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. यातील पहिला वनडे नागपूरच्या व्हिसिए मैदानावर खेळवला जात आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया बऱ्याच काळानंतर वनडे मालिका खेळत आहे. T20 मालिकेत दारुण पराभव पत्करल्यानंतर, इंग्लंडसमोर वनडे मालिकेत पुनरागमन करण्याचं आव्हान असेल. मालिकेतील पहिल्या वनडे सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरनं प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा यांना वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
🚨 Team News
— BCCI (@BCCI) February 6, 2025
We have 2⃣ ODI debutants in the Playing XI today - Yashasvi Jaiswal and Harshit Rana 🧢 🧢
A look at our line-up 🔽
Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/EFQQJmUFwh
8 चेंडूत गमावल्या 3 विकेट : या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लिश संघाची सुरुवात वादळी झाली. इंग्लिश संघानं फक्त 6 षटकांत 50 धावा पूर्ण केल्या. दरम्यान, सहाव्या षटकात फिल सॉल्टनं हर्षित राणाच्या गोलंदाजीवर 26 धावा (6, 4, 6, 4, 0, 6) केल्या. दुसरा सलामीवीर बेन डकेटनंही शमीविरुद्ध काही उत्कृष्ट फटके खेळले. भारताला पहिलं यश 75 धावांवर मिळालं, फिल साल्ट श्रेयस अय्यरच्या थ्रोवर धावबाद झाला. साल्टनं 26 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीनं वादळी 43 धावा केल्या. त्यानंतर हर्षित राणानं दुसरा सलामीवीर बेन डकेटला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. डकेटचा झेल यशस्वी जयस्वालनं घेतला. डकेटनं 29 चेंडूत 32 धावा केल्या, ज्यात सहा चौकारांचा समावेश होता. 10व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर हर्षितनं हॅरी ब्रूकला केएल राहुलकडून विकेटमागे झेलबाद केलं. अशाप्रकारे इंग्लंडनं आक्रमक सुरुवातीनंतर 8 चेंडूत 3 विकेट गमावल्या.
𝗠. 𝗢. 𝗢. 𝗗! ☺️👌
— BCCI (@BCCI) February 6, 2025
First ODI wicket for Harshit Rana ✅
First catch in ODIs for Yashasvi Jaiswal ✅
Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPjmF#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ii2GO6uWOm
नागपूरच्या खेळपट्टी अहवाल : विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या या मैदानावर आतापर्यंत एकूण 09 वनडे सामने खेळले गेले आहेत. या ठिकाणी एका वेळी 45,000 प्रेक्षक बसू शकतात. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवरील खेळपट्टी सामान्यतः फिरकी गोलंदाजांसाठी योग्य मानली जाते. तथापि, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये या मैदानावरील तुटलेल्या खेळपट्टीवर उच्च धावसंख्येची स्पर्धा अपेक्षित आहे. मधल्या षटकांमध्ये चांगल्या धावा करणाऱ्या संघाला याचा फायदा होईल. नाणेफेक जिंकणारा संघ या विकेटवर लक्ष्याचा पाठलाग करु इच्छितो.
𝗨𝗽𝗱𝗮𝘁𝗲:
— BCCI (@BCCI) February 6, 2025
Virat Kohli was unavailable for selection for the 1st ODI due to a sore right knee.
Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank https://t.co/mqYkjZXy1O
2019 मध्ये झाला होता शेवटचा वनडे : या मैदानावर शेवटचा वनडे सामना 2019 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला होता. या सामन्यात टीम इंडियानं ऑस्ट्रेलियन संघाचा 9 धावांनी पराभव केला. त्या सामन्यात भारताचा अव्वल फलंदाज विराट कोहलीनं शानदार शतक झळकावलं. अशा परिस्थितीत, चाहत्यांना या सामन्यातही कोहलीकडून शानदार खेळीची अपेक्षा असेल. त्या सामन्यात विराट सामनावीर होता. या मैदानावर आतापर्यंत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. त्यानं या मैदानावर 5 डावात 81.25 च्या सरासरीनं आणि 105.17 च्या स्ट्राईक रेटनं 325 धावा केल्या आहेत.
RUN-OUT!
— BCCI (@BCCI) February 6, 2025
Confusion in the middle and #TeamIndia makes the most of it! 👏 👏
Shreyas Iyer 🤝 KL Rahul
Follow The Match ▶️ https://t.co/lWBc7oPRcd#INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/NyyQpcA4S7
भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक (3 वनडे सामने) :
- पहिला वनडे सामना : 06 फेब्रुवारी 2025, नागपूर (विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम)
- दुसरा वनडे सामना : 09 फेब्रुवारी 2025, कटक (बारबाती स्टेडियम)
- तिसरा वनडे सामना : 12 जानेवारी 2025, अहमदाबाद (नरेंद्र मोदी स्टेडियम)
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
इंग्लंड : बेन डकेट, फिल साल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
हेही वाचा :