महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

अयोध्यातील माकडांच्या खाऊसाठी अक्षय कुमारनं दान केले 1 कोटी रुपये - AKSHAY KUMAR TO FEED MONKEYS

Akshay Kumar to feed monkeys : अयोध्यातील माकडांना खाद्य पुरवठा करण्यासाठीच्या उपक्रमात अक्षय कुमार सामील झाला आहे. यासाठी त्यानं 1 कोटीचं दान केलं आहे.

Akshay Kumar
अक्षय कुमार (ANI)

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 29, 2024, 7:42 PM IST

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार अयोध्येतील माकडांच्या खाद्यासाठीच्या उपक्रमात सामील झाला आहे. अक्षयच्या टीमनं शेअर केलेल्या माहितीनुसार, अक्षयने दिवाळीच्या अगोदर भगवान रामाची भूमी असलेल्या अयोध्येत माकडांना खायला देण्यासाठी 1 कोटी रुपये दिले आहेत. सासरे राजेश खन्ना यांच्या स्मरणार्थ त्यानं ही मदत केली आहे.

अयोध्येतील माकडांना खाद्या पुरवठा करण्याचा उपक्रम जगतगुरु स्वामी राघवाचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अंजनेय सेवा ट्रस्टने चालवला आहे.अंजनेय सेवा ट्रस्टच्या संस्थापक-विश्वस्त, प्रिया गुप्ता म्हणाल्या की यामुळे लोकांची गैरसोय होणार नाही याची काळजी ते घेणार आहेत.

"अक्षय कुमारला नेहमीच एक अत्यंत दयावान आणि उदार माणूस म्हणून मी ओळखतो. तो त्याचे कर्मचारी असोत, क्रू मेंबर्स असतो की, सहकलाकार असतो तो सर्वांशीच आपल्या घरातील सदस्यांप्रमाणे वागतो. त्यानं केवळ तातडीनं देणगी पाठवली नाही तर त्याचे आई-वडील हरी ओम आणि अरुणा भाटिया आणि त्याचे सासरे राजेश खन्ना यांच्या नावाने ही मदत दिली आहे. अक्षय दानशूर असण्याबरोबरच सामाजिकदृष्ट्या जागरूक नागरिक देखील आहे. अयोध्येमध्ये आम्ही माकडांना खाऊ घालताना कोणत्याही नागरिकाची गैरसोय होणार नाही याची काळजी घेऊ, तसेच माकडांना खायला दिल्यानं अयोध्येच्या रस्त्यावर कचरा पडणार नाही," असं प्रिया गुप्ता म्हणाल्या.

दरम्यान, अभिनयाच्या आघाडीवर, अक्षय कुमार याचा सिंघम अगेन हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अजय देवगण, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, दीपिका पदुकोण आणि करीना कपूर खान यांच्याबरोबर तो स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. हा नाट्यमय मनोरंजक चित्रपट रोहित शेट्टीने दिग्दर्शित केला असून अर्जुन कपूर आणि जॅकी श्रॉफ यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय अक्षय कुमारच्या हातामध्ये 'हाऊसफुल 5', 'वेलकम टू द जंगल' आणि 'भूत बांगला' हे चित्रपट देखील आहेत. अलीकडेच त्याचा सरफिरा हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. यातील त्याच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं होतं. हा चित्रपट आता ओटीटीवर रिलीज झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details