मुंबई : अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या विभक्त होण्याच्या बातम्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अभिषेक बच्चनचं नाव 'दसवीं पास' चित्रपटामधील सहअभिनेत्री निम्रत कौरबरोबर सध्या जोडलं जात आहे. दरम्यान, अभिषेक बच्चन मुंबई विमानतळावर स्पॉट झाला. त्यावेळी, पापाराझींनी अभिषेकवर कॅमेरे फोकस केला, यानंतर त्यानं चिंतित होऊन पापाराझींसमोर हात जोडले. अभिषेक त्याचा मित्र आणि चित्रपट निर्माता बंटी वालियाबरोबर यावेळी होता. विमातळावर अभिषेक हा खूप डिस्टर्ब असल्याचा दिसला.
अभिषेक बच्चननं पापाराझींना जोडले हात : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये अभिषेक बच्चन कॅज्युअल लूकमध्ये दिसला. यावेळी त्यानं निळ्या रंगाचा स्वेटशर्ट आणि बेज रंगाची पँट घातली होती. व्हिडिओत तो त्याच्या कारच्या दिशेनं जात होता, यावेळी पापाराझींनी त्याचा पाठलाग केला. यानंतर अभिषेक बच्चननं पापाराझींना हात जोडून 'बस्स, भाऊ.' धन्यवाद' असं म्हटलं. यादरम्यान अभिषेक हा पापाराझींबरोबर फोटो काढण्यासाठीही थांबला नाही. याशिवाय यावेळी त्याच्या चेहऱ्यावर हसूही दिसले नाही. यापूर्वी अभिषेक बच्चन त्याची आई जया बच्चनबरोबर मुंबई विमानतळावर दिसला होता. यावेळी अभिषेकची बहीण श्वेता बच्चनही तिथे उपस्थित होती. याठिकाणी देखील अभिषेक पापाराझींकडे न पाहता हात जोडून निघून गेला होता.