हैदराबाद Instagram Reels posted to threads:एक वर्षापूर्वी मेटानं मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचं ट्विटर) शी स्पर्धा करण्यासाठी मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म थ्रेड्स लाँच केलं होतं. जसजसं प्लॅटफॉर्म लोकप्रिय होत आहे, तसे मेटा ॲपमध्ये अनेक नवीन फिचर जोडण्याचा विचार करत आहे.
थ्रेड्समध्ये क्रॉस-पोस्टिंग फिचर : कंपनी सध्या एका नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे, जे वापरकर्त्यांना थेट थ्रेड्सवर Instagram रील्स पोस्ट करण्यास अनुमती देईल. हे नवीन वैशिष्ट्य मेटाच्या ॲप्समधील सामग्री सामायिकरण जास्तीत जास्त करण्यासाठी क्रॉस-पोस्टिंग कार्यक्षमता सक्षम करण्याच्या योजनेचा भाग असू शकतं.
नवीन वैशिष्ट्याची चाचणी :सुप्रसिद्ध विकसक ॲलेसॅन्ड्रो पलुझी (@alex193a) यांनी दावा केला आहे की, थ्रेड्स एका नवीन वैशिष्ट्याची चाचणी करत आहे, जे वापरकर्त्यांना Instagram रील्स आणि पोस्ट थेट थ्रेड्सवर शेअर करण्याची परवानगी देईल. पलुझीनं शेअर केलेल्या स्क्रीनशॉटनुसार, थ्रेड्सवरील ड्रॉप-डाउन मेनूमध्ये विद्यमान GIF, नवीन Instagram पर्याय समाविष्ट आहे. थ्रेड्समधील कंपोझ बॉक्समध्ये नवीन Instagram बटण टॅप केल्यानं Instagram पोस्ट आणि रील्ससह ग्रिड उघड होईल. त्यानंतर वापरकर्ते त्यांना थ्रेडवर कोणतं रील आणि पोस्ट शेअर करायचं ते निवडू शकतात. याबात Meta नं TechCrunch ची पुष्टी केलीय.