ETV Bharat / state

सुन्या सुन्या नव्हे, जागतिक विक्रम नोंदवणारी रंगली मैफील; पोलीस, शिक्षकासह अधिकारी झाले गायक - AMRAVATI MUSIC CONCERT

संगीतयम मैफीलीचा अनोखा विक्रम मंगळवारी अमरावतीत नोंदविण्यात आला. सलग ४०१ तास चाललेल्या मैफीलीत पाच हजारांहून अधिक गाणी सादर करण्यात आली आहेत.

unique world record in Amravati
अमरावती संगीत मैफिल (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2025, 9:32 AM IST

Updated : Jan 22, 2025, 12:56 PM IST

अमरावती- अमरावतीत संगीतप्रेमी आणि हौशी कलावंतासाठी अनोख्या अशा संगीत मैफीलीचं (unique world record in Amravati) आयोजन करण्यात आलं. साडेपाच हजारांहून अधिक गाणी, कविता आणि दोन-तीन मिनिटांचे नृत्य, अशी मैफील सलग 18 दिवस अमरावती शहरातील अभियंता भवन येथे रंगली. या मैफीलीचा सुखद अनुभव संगीतप्रेमींना घेता आला.

अमरावतीमधील 401 तासांचा संगीत मैफीलीचा विक्रम नोंदविण्यात येणार असल्याचं दिल्लीचे वर्ल्ड रेकॉर्डचे सीईओ पवन सोलंकी यांनी जाहीर केलं. त्यानंतर अभियंता भवन सभागृहात कलावंतांनी जल्लोष केला. यावेळी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी केप कापून कलावंतांचा उत्साह वाढवला.

अशी रंगली संगीत मैफील- अमरावती शहरातील स्वराज्य एंटरटेनमेंट या हौशी गायकांच्या संस्थेमार्फत सलग गाण्यांचा विक्रम नोंदविण्यासाठी 4 जानेवारीपासून विशेष विक्रमी अभियानाला प्रारंभ झाला. अमरावती शहरातील विविध भागात असणारे हौशी गायक आणि कलावंत या विक्रमात आपला सहभाग नोंदविण्यासाठी समोर आले. सलग 18 दिवसांमध्ये अडीच ते तीन हजार हौशी गायकांनी या मैफीलीत आपल्या गाण्यांनी वातावरण संगीतयम केलं. विशेष म्हणजे विविध क्षेत्रातील हौशी गायक या मैफीलीत सहभागी झाले. पोलीस खात्यातील अधिकारी, विविध सरकारी विभागातील कर्मचारी, महापालिकेतील उपायुक्त, शिक्षक, जिल्हा परिषदेतील अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी अशा विविध विभागातील कर्मचारी मैफीलीत जमले. आपल्या व्यवसायासोबत गाण्याची कला जोपासणारे अनेक हौशी कलावंत या संगीतमय सोहळ्यात सहभागी झाले.

संगीतमय मैफीलीचा रंगला कार्यक्रम (Source- ETV Bharat Reporter)

न थकता, न कंटाळता धमाल- जागतिक विक्रम करण्याच्या उद्देशानं रंगमंचावर आलेल्या कलावंतांनी 4 जानेवारीला गाण्यांना सुरुवात केली. हा नॉनस्टॉप धमाल 401 तासांपर्यंत अगदी कायम राहिला. चित्रपटातील जुन्या नव्या गीतांसह गझल, भक्ती गीत, प्रेमगीत यासह सर्व प्रकारच्या गाण्यांचं सादरीकरण झालं. मैफीलीत हौशी कलावंताचा सहभाग असताना मंच रिकामा राहणार नाही, याची दखल कार्यक्रम सुरू झाल्यापासून घेण्यात आली.

24 तासात केवळ वीस मिनिटांचा ब्रेक- हा विक्रम नोंदविण्यासाठी काही अटींचे पालन करण्यात आलं. 24 तासांत केवळ वीस मिनिटच रंगमच रिकामा राहील, याची दक्षता आयोजकांकडून घेण्यात आला. नियमानुसार अगदी सलग वीस मिनिट रंगमंच रिकामा ठेवण्याची परवानगी नव्हती. "एखादं गाणं सादर झाल्यावर दुसऱ्या गायकाला मंचावर येण्यासाठी वेळ लागणं, गाणं सेट होणं, या दरम्यान लागणारा अर्धा-एक मिनिटांचा कालावधी 24 तासातील वीस मिनिटांसाठी गणला जातो," अशी माहिती स्वराज्य एंटरटेनमेंटचे प्रमुख दिनकर तायडे यांनी दिली.

Last Updated : Jan 22, 2025, 12:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.