ETV Bharat / entertainment

प्रियांका चोप्रा करणार भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन, चिलकूर बालाजी मंदिराला दिली भेट... - PRIYANKA CHOPRA

प्रियांका चोप्रा जोनासनं अलीकडेच हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिराला भेट दिली आहे. आता तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

priyanka chopra
प्रियांका चोप्रा (प्रियांका चोप्रा (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jan 22, 2025, 10:36 AM IST

मुंबई - ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा जोनासनं अलीकडेच हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिरला भेट दिली आहे. आता तिचे सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. याशिवाय तिनं आपल्या इंस्टाग्राम पेजवर देखील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना प्रियांका चोप्रानं असेही सांगितलं की तिनं, तिच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू करण्यापूर्वी देवाला आशीर्वाद मागितला आहे. पोस्टमध्ये, प्रियांकानं साऊथ सुपरस्टार राम चरणची पत्नी उपासना कोनिडेलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. प्रियांका भारतीय चित्रपटांमध्ये पुनरागमन करणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.

प्रियांका चोप्रानं चिलकूर बालाजी मंदिरात केलं दर्शन : प्रियांका चोप्राची पोस्ट पाहिल्यानंतर चाहत्यांना असं वाटतं आहे की, तिनं ज्याप्रकारे नवीन अध्यायबद्दल उल्लेख केला आहे, तो तिच्या आगामी चित्रपटाशी संबंधित आहे. सध्या प्रियांकाचं नाव महेश बाबू आणि एसएस राजामौली यांच्या आगामी 'एसएसएमबी29' या चित्रपटाशी जोडले जात आहेत. 2019 मध्ये आलेल्या 'द स्काय इज पिंक'नंतर प्रियांका चोप्रा भारतीय चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. प्रियांका अनेकदा भारतात येत असते. अलीकडेच प्रियांका चोप्राबद्दल बातमी आली होती की ती महाकुंभ मेळाव्यात पोहचली आहे. मात्र आता प्रियांकाच्या पोस्टद्वारे स्पष्ट झालं आहे, की ती हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिरात दर्शन घेण्यासाठी आली आहे.

प्रियांका चोप्राचे पोस्ट व्हायरल : प्रियांकानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं, 'श्री बालाजीच्या आशीर्वादानं एक नवीन अध्याय सुरू होत आहे. आपल्या सर्वांच्या मनात शांती असो, सर्वत्र समृद्धी आणि आनंद लाभो. देवाचा आशीर्वाद सर्वांवर असो, ओम नमो नारायणाय.' या पोस्टमध्ये प्रियांकानं राम चरणची पत्नी उपासना कामिनेनी कोनिडेला देखील टॅग केलं आहे. यानंतर उपासनानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. उपासनानं या पोस्टवर कमेंट करत लिहिलं, 'तुमच्या नवीन चित्रपटासाठी शुभेच्छा. भगवान वेंकटेश्वर तुम्हाला भरपूर आशीर्वाद देवोत.' दरम्यान प्रियांकाच्या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर अनेक चाहते तिला तिच्या नवीन चित्रपटाबद्दल विचारताना दिसत आहेत. तसेच काही चाहते या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून प्रियांकावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्राचा इन्स्टाग्राम व्हिडिओ पाहून ती महाकुंभमेळ्याला जात असल्याचा युजर्सचा अंदाज
  2. लॉस एंजेलिसमध्ये भीषण आग, 97व्या अकादमी पुरस्कारांवर झाला परिणाम....
  3. सोनाक्षी सिन्हा ते प्रियांका चोप्रापर्यंत, 'या' अभिनेत्री केला सर्वाधिक प्रवास, पाहा एक झलक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.