कोलकाता IND vs ENG 1st T20I Live Streaming : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील 5 सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज 22 जानेवारी 2025 रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथं खेळवला जाईल. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे.
Lights 🔛
— BCCI (@BCCI) January 21, 2025
Smiles 🔛
Headshots ✅#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/C5un9Le8HD
कसोटीनंतर आता T20 क्रिकेट : T20 विश्वविजेता भारत आपल्या घरच्या मैदानावर परतत आहे, जिथं त्यांचा सामना इंग्लंड संघाशी होणार आहे. कसोटी क्रिकेटच्या काही महिन्यांनंतर, चाहत्यांना आता T20 मध्ये 'मेन इन ब्लू' संघ दिसेल. सूर्यकुमार यादव भारतीय T20 संघाचं नेतृत्व करेल, ज्यामध्ये हार्दिक पंड्या आणि अक्षर पटेल यांचाही समावेश आहे. बराच काळ दुखापतीनंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी देखील राष्ट्रीय संघात पुनरागमन करत आहे. दुसरीकडे, जॉस बटलर इंग्लंड संघाचे नेतृत्व करेल.
📍 Kolkata
— BCCI (@BCCI) January 20, 2025
Gearing 🆙 for the #INDvENG T20I series opener 😎#TeamIndia | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ocvsS4Y4R3
दोन्ही संघांचा हेड-टू-हेड रेकॉर्ड काय : भारत आणि इंग्लंड यांनी T20 सामन्यांमध्ये एकमेकांविरुद्ध 24 सामने खेळले आहेत. यात भारतानं 13 सामने जिंकले तर इंग्लंडनं फक्त 11 सामने जिंकले आहेत.
खेळपट्टी कशी असेल : कोलकाताच्या ईडन गार्डन्सची खेळपट्टी नेहमीच फलंदाजांसाठी स्वर्गापेक्षा कमी राहिली नाही. इथं चेंडू बॅटवर उसळी घेऊन येतो. या कारणास्तव, या मैदानावर फलंदाजी करणं सोपं होतं आणि बरेच चौकार आणि षटकार दिसतात. जर सामन्यात दव पडला तर गोलंदाजांसाठी ते अडचणीचं ठरु शकतं. या कारणास्तव, भारतीय संघ अंतिम अकरा संघात दोन फिरकी गोलंदाज आणि तीन वेगवान गोलंदाजांना खेळवू शकतो. कोलकात्याची खेळपट्टी फलंदाजांना मदत करु शकते.
Firepower with bat and ball 💥
— England Cricket (@englandcricket) January 21, 2025
Brendon McCullum has named the first white-ball team of his reign for tomorrow's opening IT20 v India 💪 pic.twitter.com/DSFdaWVPrB
कोलकातामध्ये भारताचा रेकॉर्ड कसा : कोलकात्यातील ईडन गार्डन्स मैदानावर टीम इंडिया आणि इंग्लंड जवळजवळ 13 वर्षांनी एकमेकांसमोर येणार आहेत. यापूर्वी, दोन्ही संघ 29 ऑक्टोबर 2011 रोजी आमनेसामने आले होते. कोलकात्याच्या ऐतिहासिक मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात फक्त एकच T20 सामना खेळला गेला आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर इंग्लंडविरुद्ध झालेल्या T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड चांगला नाही. टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध 6 विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता.
The Brendon McCullum era as men's white-ball coach is about to get underway 💪
— England Cricket (@englandcricket) January 21, 2025
Entertainment is guaranteed 👊 🍿 pic.twitter.com/kllxTJG1Wr
भारत विरुद्ध इंग्लंड T20I मालिकेचं वेळापत्रक :
- पहिला T20I सामना : 22 जानेवारी 2025, कोलकाता
- दुसरा T20I सामना : 25 जानेवारी 2025, चेन्नई
- तिसरा T20I सामना : 28 जानेवारी 2025, राजकोट
- चोथा T20I सामना : 31 जानेवारी 2025, पुणे
- पाचवा T20I सामना : 02 फेब्रुवारी 2025, मुंबई (वानखेडे)
🤝 " i've been looking forwards to working with baz for a long time"
— England Cricket (@englandcricket) January 21, 2025
🇮🇳 "playing in india is always a treat for any cricketer"
😃 "i've been practicing my smiling in the mirror!"
watch the full interview with @josbuttler ahead of our opening T20I match in Kolkata tomorrow 👇 pic.twitter.com/EVTCeFeyNi
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला T20 सामना कधी आणि कुठं खेळवला जाईल?
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला T20 सामना 22 जानेवारी 2025 रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स इथं संध्याकाळी 7:00 वाजता खेळवला जाईल. ज्याची नाणेफेक संध्याकाळी 06:30 वाजता होईल.
A positive Suryakumar Yadav opens up on his approach for the #INDvENG T20Is 👊https://t.co/cXkMpPh7QD
— ICC (@ICC) January 21, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड पहिला T20 सामना कुठं आणि कसा पाहायचा?
भारत आणि इंग्लंड यांच्यातील T20 मालिका भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवरुन थेट प्रक्षेपित केली जाईल. क्रिकेट प्रेमी हे रोमांचक सामने त्यांच्या टेलिव्हिजन सेटवर थेट पाहू शकतात. याव्यतिरिक्त, डिजिटल प्रेक्षकांसाठी लाइव्ह स्ट्रीमिंग डिस्ने+हॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल. तसंच डीडी स्पोर्ट्सला भारत विरुद्ध इंग्लंड T20 मालिकेचे प्रसारण हक्क मिळाले आहेत, ज्याचं थेट प्रक्षेपण फक्त डीडी फ्री डिशवर उपलब्ध असेल.
दोन्ही संघांची प्लेइंग 11 :
- भारत : संजू सॅमसन (यष्टिरक्षक), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती
- इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, ब्रायडन कार्स, साकिब महमूद, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, आदिल रशीद
हेही वाचा :